Photo Credit- Intsa

Nitish Kumar Reddy: ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याने बॅट आणि बॉल दोन्हीने धुमाकूळ घातला. फास्ट गोलंदाजीतील अष्टपैलू खेळाडू, बॉर्डर गावस्कर मालिकेत(,Border Gavaskar Trophy) दमदार खेळाडू म्हणून उदयास आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून घरी परतताच नितीश कुमार रेड्डी याने भगवान वेंकटेश्वर स्वामींच्या मंदिराला (Tirupati Temple) भेट दिली. त्यामुळे सध्या खेळासह त्याच्या देवदर्शनामुळे तो चर्चेत आला आहे. (Virat Kohli Visit Vrindavan Dham with Family: प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले विराट-अनुष्का; मुले अकाय-वामिका यांचे फोटो व्हायरल)

तिरुपती मंदिराला भेट

ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर, काल सोमवारी त्याने तिरुपती मंदिराला भेट दिली. विशेष म्हणजे त्याने गुडघ्यांवर मंदिराच्या पायऱ्या चढल्या. मंदीराच्या पायऱ्या चढतानाचा एक व्हिडिओ त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. दृश्यांमध्ये तो काही पायऱ्या चढताना दिसत आहे. मात्र, ही दृश्य शेअर होताच काही वेळात व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

घरी पोहोचल्यावर भव्य स्वागत

यापूर्वी, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, ऑस्ट्रेलियाहून घरी परतल्यावर या नितीश कुमार रेड्डीचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. नितीश एका जीपसमोर बसलेला दिसला, त्यांच्यासोबत त्यांचे वडील होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्तम कामगिरी

मूळचा आंध्र प्रदेशचा असलेल्या 21 वर्षीय क्रिकेटपटूने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघासाठी सर्व 5 सामने खेळले. ज्यात एका शतकाच्या मदतीने त्याने 298 धावा केल्या. तो या मालिकेत भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मालिकेत त्याने 5 विकेट्सही घेतल्या.