Indian Army Day 2025 Wishes: भारतीय सैन्याच्या असाधारण शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन (लष्कर दिन) साजरा केला जातो. जनरल के. एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती झाल्याच्या स्मरणार्थ भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. भारतीय लष्कर दिन देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. भारतीय लष्कर दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी १९४९ सालापासून आहे जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला. जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्यानंतर जनरल के. एम. करिअप्पा यांनी पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. या स्थित्यंतरामुळे भारतीय लष्करावरील ब्रिटिश वसाहतवादी प्रभाव संपुष्टात आला. भारतीय लष्कर दिन केवळ हा ऐतिहासिक क्षण साजरा करत नाही तर देशाची शौर्याने सेवा करणाऱ्या, सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि शांतता राखणाऱ्या सैनिकांना आदरांजली म्हणुन साजरा केला जातो. भारतीय सैन्य दिन 2025 चे औचित्य साधताना, आम्ही लेटेस्टलीमध्ये खास संदेश घेऊन आलो आहोत जे आपण डाउनलोड करू शकता आणि या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांना पाठवु शकता. व्हॉट्सअ ॅप स्टिकर्स, प्रतिमा आणि एसएमएससह भारतीय सैन्य दिन 2025 च्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आपल्या सर्व प्रियजनांना डाउनलोड आणि सामायिक करू शकता.
भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा..!!
भारत भूमीच्या सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या
भारतीय जवानांना कोटी कोटी प्रणाम...
भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा!!
रक्षिता तुम्ही आम्हा, प्राणास घेऊन हाती,
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती,
एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी,
सैनिक हो तुमच्यासाठी...
भारतीय सेना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
भारतीय सेना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला
भारतीय सेना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
भारतीय लष्कराची भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतीय लष्कर दिन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यामुळे नागरिकांच्या मनात सैन्यदलांविषयी देशभक्ती आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. लष्करी जवानांच्या बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी आणि देशाप्रती कर्तव्य आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये अनेकदा कार्यक्रमांचे आयोजन करतात. सर्वांना भारतीय लष्कर दिन 2025 च्या हार्दिक शुभेच्छा!