Wisden ने केली दशकाच्या टॉप-5 क्रिकेटपटूंची घोषणा, टीम इंडियाच्या 'या' एका खेळाडूचा समावेश
इंडियन टीम (Photo Credit: Getty Images)

विस्डेनने (Wisden) जाहीर केलेल्या दशकातील पाच क्रिकेटपटूंच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. कोहलीसोबत इतर चार क्रिकेटपटू-स्टिव्ह स्मिथ (Steve Smith), डेल स्टेन (Dale Steyn), एबी डिव्हिलियर्स )AB de Villiers) आणि अ‍ॅलिस पेरी (Ellyse Perry) यांचा समावेश झाला आहे. सर्वच प्रकारे या दशकात कोहलीने इतर कोणत्याही फलंदाजाच्या तुलनेत जास्त धावा केल्या आहेत. आयसीसीने कोहलीबद्दल काही आश्चर्यकारक आकडेवारी पोस्ट केली. ज्याद्वारे त्यांनी विराटचे या दशकात विश्व क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व दर्शवून दिले आहे. कोहलीने या दशकात 22 शतकांसह5,775 सर्वाधिक धावा केल्या आहेत. विस्डेन कोहलीविषयी म्हणाले, "विराट वेळोवेळी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उभा राहिला आहे.  2014 मधील इंग्लंड दौर्‍यापासून बांग्लादेशविरुद्ध अखेरच्या कसोटी मालिकेपर्यंत विराटने 63 च्या सरासरीने धावा केल्या. यामध्ये 21 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे." (क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महेंद्र सिंह धोनी याला दिला मोठा सन्मान; बनवले ODI Team Of Decade चा कर्णधार, रोहित शर्मा-विराट कोहली ही अंतिम 11 मध्ये)

दरम्यान, यावर्षी विराटने 64.05 च्या सरासरीने स्वरूपात 2,370 धावा केल्या. 31 वर्षीय विराटने सलग चौथ्यांदा कॅलेंडर वर्षात 2000 पेक्षा अधिक धावांची नोंद केली. कोहली जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 50 पेक्षा जास्त सरासरी आहे. भारतीय क्रिकेटच्या शेवटच्या काही वर्षांत सचिन तेंडुलकर याने निवृत्ती घेतल्यानंतर आणि एमएस धोनी याच्या कर्णधारपद सोडल्यापासून जगातील कोणत्याही क्रिकेटपटूने कोहलीइतका दबावाचा सामना केला नाही. दरम्यान, यापूर्वी या दशकातील विस्डेन कसोटी संघाचा कर्णधार म्हणून भारतीय कर्णधाराची निवड झाली आहे. विस्डेनच्या दशकातील वनडे संघात एमएस धोनी, रोहित शर्मा आणि अन्य भारतीयांसह स्थान मिळाले.

दुसरीकडे, विराटऐवजी ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचाही समावेश झाला आहे. स्मिथने यंदा बॉल-टेम्परिंगच्या बॅननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि अ‍ॅशेस मालिकेत जोरदार खेळ करत सर्वांचे मनोरंजन केले. अ‍ॅलिस पेरी ही टॉप पाचमधील एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. पेरीने 81 वनडे सामन्यात66.12 च्या सरासरीने 2,711 धावा आणि 116 विकेट्सही घेतल्यास आहे. टी-20 मध्ये तिने 1065 धावा आणि 102 सामन्यांमध्ये 19 गडी बाद केले आहे. पेरीने स्वतःला महिला क्रिकेट विश्वात सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण केली आहे.