
खेळाडू आपला खेळाडू जर्सी नंबर विचारपूर्वक निवडतात. क्रिकेट विश्वात 10 आणि 18 जर्सी नंबर अनुक्रमे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी प्रसिद्ध केली. क्रिकेटपटूंना जर्सी नंबर देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची कोणतीही भूमिका नसते, खेळाडू खुद्द विचारपूर्वक आपला जर्सी नंबर फायनल करतात. खेळाडूंचा जर्सी नंबर त्यांची ओळख बनते. एखाद्या खेळाडू निवृत्त झाला तरीही त्याची जर्सी नंबर त्याच्या फॅन्सच्या नेहमीच लक्षात असते. सचिन 2013 मध्ये निवृत्त झाला आणि त्यानंतर त्याची जर्सी नंबर 10 ही रिटायर करण्यात आली. याबद्दल आयसीसीने (ICC) एक ट्विट करून टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) जर्सी नंबरबद्दल विचारले. हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राष्ट्रीय टीमकडून (Indian Team) खेळताना 228 नंबरची जर्सी परिधान करतो. याच संबंधी आयसीसीने, "आपण सांगू शकता की हार्दिक पांड्या 228 क्रमांकाच्या जर्सीसह खेळायचा?" असा प्रश विचारला. ('बेबी मैं क्या हूं तेरा' हार्दिक पंड्याच्या प्रश्नाला गर्लफ्रेंड नताशा स्ताकोविक ने दिलेले उत्तर ऐकून नक्की तुम्हालाही फुटेल हसू, पाहा Video)
228 ही हार्दिकची क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. पंड्याचे हे आजवरचे क्रिकेटमधील एकमेव दुहेरी शतक आहे. बरोडाकडून अंडर-16 संघात मुंबईविरुद्ध खेळत असताना हार्दिकने मुंबई अंडर-16 विरुद्ध विजय मर्चंट अंडर-16 ट्रॉफी 2009/10 स्पर्धेत 228 धावांचा तुफान डाव खेळला आणि टीमला विजय मिळवून दिला होता. त्या विजयाची आठवण म्हणून हार्दिक 228 नंबरची जर्सी परिधान करतो. हार्दिकला 2018 आशिया कप दरम्यान दुखापत झाली होती. नंतर तो 2019 मधील आयपीएल आणि वर्ल्ड कप सामने खेळला. पण दुखापत पूर्ण बारी न झाल्याने त्याच्यवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली, त्याच्यानंतर त्याला अनेक महत्वपूर्ण मालिकांना मुकावे लागले. त्याची न्यूझीलंड दौऱ्यासाठीही संघात निवड करण्यात आली नाही. तो आयपीएलमध्ये पुनरागमन करू पाहत होता, पण स्पर्धा पुढे ढकलली गेल्याने त्याची पुनरागमन करण्याची प्रतिक्षाही लांबणीवर गेली.
🤔🤔🤔
Can you tell why @hardikpandya7 used to sport a jersey with the number 228? pic.twitter.com/5ZZdTHb4xu
— ICC (@ICC) May 21, 2020
दुसरीकडे, हार्दिकप्रमाणे वेस्ट इंडिजचा तुफान फलंदाज आणि 'युनिव्हर्स बॉस' नावाने प्रसिद्ध क्रिस गेलचा जर्सी नंबर सुरुवातीला वेगळा होता, पण त्याने 2010 मध्ये श्रीलंकाविरुद्ध 333 धावांची खेळी केली तेव्हापासून तो हा त्रिशतकी नंबर अभिमानाने जर्सी नंबर म्हणून परिधान करतो. शिवाय, टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा जन्म 7 जुलैला झाला असल्याने या नंबरची निवड केली.