⚡पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा
By Prashant Joshi
इंडिगोने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आमच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. आमची टीम सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांना सर्वोत्तम पर्याय देण्यासाठी काम करत आहे.’