Houses of 2 Terrorists, Suspected To be Involved in PAhalgam Attacks, Demolished in Jammu and Kashmir’s Tral and Bijbehara (Photo Credits: X/@IANS_India)

पहलगाम (Pahalgam) मध्ये बैसरण व्हॅली मध्ये 22 एप्रिल दिवशी चार दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला. धर्म विचारून हिंदूंची हत्या करण्यात आल्यानंतर सध्या देशात या घटनेविरूद्ध असंतोषाचा वातावरण आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला करणार्‍यांना आणि या हल्ल्या मागील सूत्रधारांना भारताकडून त्यांनी अपेक्षा देखील केली नसेल अशी अद्दल घडवणार असल्याचं निर्धार  व्यक्त केला आहे. सध्या पहलगाम मधील हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. अशातच सुरक्षा रक्षकांनी आता कारवाईला सुरूवात केली आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी या हल्ल्यात  सहभागी दोन दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण काश्मीरमधील त्रालच्या मंगनहमा येथे दहशतवादी आसिफ शेखच्या घराची झडती घेण्यासाठी सुरक्षा दलांचे एक पथक गेले होते. शोध मोहिमेदरम्यान, सैनिकांना घरात एक आयईडी आणि काही इतर स्फोटके दिसली.सुरक्षा दलांची टीम बाहेर येताच स्फोट झाला. दहशतवादी हल्ल्यामागील कटात आसिफ शेखचा सहभाग असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या स्फोटामागील कारणाची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. नक्की वाचा:  India Strikes Back: सिंधू पाणी करार स्थगित, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी; Pahalgam Terror Attack नंतर भारताचे 5 महत्त्वाचे निर्णय .

आसिफ शेखच्या घराचा स्फोट

बिजबेहारा येथील गुरी येथे राहणारा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आदिल ठोकर उर्फ ​​आदिल गुरी याचे घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले आहे. त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.

आदिल ठोकर चं घर उद्ध्वस्त

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी TRF या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नाव आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा आहे. सध्या त्यांची माहिती देणार्‍यांना 20 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.