इस्त्रो चे माजी चेअरमन डॉ.के कस्तुरीरंगन यांचे बेंगळूरू मध्ये निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. 9 वर्ष त्यांनी इस्त्रो चं नेतृत्त्व केले आहे.डॉ. कस्तुरीरंगन यांनी ऑगस्ट 2003 मध्ये निवृत्त होईपर्यंत अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणूनही काम करत होते. जुलै 2023 मध्ये, श्रीलंकेला भेट देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना उपचारांसाठी विमानाने बेंगळुरूला नेण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवलेले होते.

डॉ.के कस्तुरीरंगन यांचे बेंगळूरू मध्ये निधन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)