Rise of the Half Moon Google Doodle: गुगलने सादर केले 'राईज ऑफ द हाफ मून एप्रिल' नावाने लूनर-थीम असलेल्या कार्ड गेमचे डूडल (View Pic)

हा मासिक आवर्ती कार्ड गेम तुम्हाला चंद्राविरुद्ध खेळण्यासाठी आमंत्रित करतो आणि चंद्रचक्राबद्दलचे तुमचे ज्ञान तपासतो.

Rise of the Half Moon Google Doodle: गुगलने सादर केले 'राईज ऑफ द हाफ मून एप्रिल' नावाने लूनर-थीम असलेल्या कार्ड गेमचे डूडल (View Pic)
Rise of the Half Moon Google Doodle

Rise of the Half Moon Google Doodle: आज, 24 एप्रिल 2025 रोजी गुगलने 'राईज ऑफ द हाफ मून एप्रिल' या नावाने एक नवीन इंटरॅक्टिव्ह डूडल सादर केले, जे महिन्याच्या शेवटच्या हाफ मून फेजचे प्रतीक आहे. या डूडलद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून गुगल डूडल वापरकर्त्यांना एका खास ऑनलाईन खेळाद्वारे चंद्र चक्रांबद्दलची त्यांची समज समजून घेण्याचा एक आकर्षक मार्ग प्रदान करत आहे. चंद्रचक्र म्हणजे चंद्राच्या वेगवेगळ्या अवस्था (टप्पे) ज्या दर महिन्याला बदलतात. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत चालणारे हे चंद्रचक्र अंदाजे 29.5 दिवसांच्या कालावधीचे असते. यावेळी चंद्र विविध प्रकारे दृश्यमान असतो.

आता गुगलने डूडलद्वारे सादर केलेला हा एक एक कार्ड गेम असून, जो तुम्हाला चंद्राविरुद्ध खेळण्यासाठी आमंत्रित करतो आणि चंद्रचक्राबद्दलचे तुमचे ज्ञान तपासतो. या सेलेस्टियल कार्ड गेममध्ये खेळाडूंना पॉइंट्स मिळविण्यासाठी, एप्रिल हाफ मून विरुद्ध चंद्र चक्राचे टप्पे जोडावे लागतील. जर तुम्ही चंद्रावर मात करण्यासाठी पुरेसे कुशल असाल, तर तुम्हाला वाइल्डकार्ड्सने बक्षीस मिळेल. जांभळ्या रंगातील गुगलचे हे डूडल अतिशय आकर्षक असून ते युजर्सना आकर्षित करत आहे.

Rise of the Half Moon Google Doodle:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2025 08:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).