पहलगाम च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये Navy officer Lieutenant Vinay Narwal चा मृत्यू झाला आहे. विनय आणि त्याची पत्नी हिमांशी हनीमून साठी कश्मीर मध्ये आले होते. लग्नानंतर आठवडाभराच्या आतचं त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. दरम्यान सोशल मीडीयात विनय आणि हिमांशी यांच्या नावे Instagram influencers Ashish Sehrawat आणि Yashika Sharma यांचा एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यात ते दोघं रोमॅन्टीक अंदाजात नाचताना दिसत आहेत. Yashika Sharma ने आपल्या नावे सध्या व्हिडिओ वायरल होत असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडीयात येऊन त्यांनी आम्ही जिवंत आहोत अशी माहिती दिली आहे. 'पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या संवेदनशील घटनेत आमचा व्हिडिओ जोडला जातो हे पाहून वाईट वाटत असल्याचं' तिने म्हटलं आहे.

 Instagram influencers Ashish Sehrawat आणि Yashika Sharma चा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)