'बेबी मैं क्या हूं तेरा' हार्दिक पंड्याच्या प्रश्नाला गर्लफ्रेंड नताशा स्ताकोविक ने दिलेले उत्तर ऐकून नक्की तुम्हालाही फुटेल हसू, पाहा Video
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. लॉकडाऊनमुळे तो त्यांची गर्लफ्रेंड नताशा स्ताकोविकसोबत (Natasa Stankovic) वेळ घालवत आहे. लॉकडाउन दरम्यान खेळाडूं सोशल मीडियावर फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांशी जोडले गेलेले आहे. क्रिकेटपटूंमध्ये हार्दिक सर्वाधिक सक्रिय असतो. मागील काही दिवसांपासून त्याने सोशल मीडियावर त्याच्या ट्रेनिंगचे फोटो पोस्ट केले आहेत आणि आता हार्दिकने गर्लफ्रेंड नताशासोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये नताशा तुटलेली हिंदी बोलत असल्याचे दिसून आले. स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडू नियमित सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि या व्हिडिओमध्ये नताशाची हिंदी ऐकून तुम्हालाही नक्की हसू फुटेल. (Coronavirus लॉकडाऊन दरम्यान रांची येथील घरी महेंद्र सिंह धोनी काय करत आहे? साक्षी धोनीने शेअर केलेला फोटो एकदा पहाच)

हार्दिक आणि नताशा आपल्या होम थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहत असल्याचे व्हिडिओत पाहता येईल. हार्दिक नताशाकडे आला आणि विचारतो, "मैं क्या हूं तेरा ..." हा प्रश्न ऐकताच नताशा हसली आणि तुटलेल्या हिंदीमध्ये म्हणाली, "जिगर का तुकडा..." हे ऐकताच हार्दिक आणि नताशा यांनाही हसू अनावर झाले. नताशाला चांगली हिंदी येत नसल्याने हार्दिक तिला हिंदीत प्रश्न विचारून तिची फिरकी घेत असतो. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

What a fun session with my babies💪🏾✌🏾

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर निलंबित किंवा रद्द केल्यामुळे, बहुतेक खेळाडूंना त्यांच्या जागेच्या एका तात्पुरत्या व्यायामशाळेत प्रशिक्षण देणे भाग पडले जेणेकरून जेव्हा खेळ पुन्हा सुरू होईल तेव्हा ते तंदुरुस्त आणि तयार असतील. हार्दिकने नुकतच त्याची मंगेतर नताशा, भाऊ क्रुणाल आणि त्याची पत्नी पंखुरीचा होम जिममध्ये वर्कआऊट करतानाच फोटो शेअर केला. दरम्यान, या वर्षाच्या सुरूवातीला हार्दिक आणि नताशाने 1 जानेवारीला गुपचूप साखरपुडा केला. मागील वर्षी सप्टेंबर 2019 नंतर हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सप्टेंबरमध्ये टी-20 रूपात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.