कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 29 मार्चपासून सुरु होणार इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) टूर्नामेंट 15 एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. देशात 21 दिवसांची लॉकडाउन सुरू आहे, जी 14 एप्रिल रोजी संपेल. आयपीएल पुढे ढकलल्यामुळे महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) पुनरागमनावर ब्रेक लागला आहे. दरम्यान, धोनी गवत कापताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व क्रिकेटपटू आपापल्या घरी कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. धोनी सोशल मीडियावर कमी सक्रिय असणाऱ्या अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मात्र, त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) सोशल मीडियावर खूप सतर्क असते. ती अनेकदा आपल्या घराचे, धोनी आणि मुलगी जीवाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. या भागात साक्षीने धोनीचा एक फोटो शेअर केले आणि लॉकडाऊन दरम्यान धोनी काय करीत आहे हे सांगितले. (Video: लॉकडाउनमध्ये एमएस धोनीची मुलगी जिवा अशा प्रकारे करत आहे स्वच्छतेची काळजी, पाहून तुम्हीही म्हणाला Aww)
साक्षी धोनीने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये धोनीचा एक चित्र शेअर केला. या फोटोत धोनी घराच्या बागेत गवत कापताना दिसत आहे. धोनी आपल्या रांची फार्म हाऊसच्या बाईक गॅरेजसमोर मैदानात गवत कापताना दिसत आहे. गवत कापण्याच्या मशीनच्या सहाय्याने धोनी कापणी करीत आहे. साक्षीच्या इन्स्टा स्टोरीतील हा फोटो फॅन्स अकाउंटवर शेअर करत आहे. यापूर्वी जिवा धोनीचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती हाऊस हेल्पच्या मदतीने स्वच्छ करण्यास मदत करत होती.
दरम्यान, आयसीसी वर्ल्ड कप 2019 मधील सेमीफायनल सामन्यानंतर धोनी एकही क्रिकेट सामना खेळला नाही. त्याने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय बीसीसीआयला कळवळा होता. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून धोनी मैदानावर पुन्हा परतणार होता, पण टूर्नामेंटची तारीख पुढे ढकल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर गेले.