Volkswagen Tiguan R-Line | (Photo source: ANI/Volkswagen)

Volkswagen India ने आज अधिकृतपणे भारतात आपली बहुप्रतिक्षित SUV, Tiguan R-Line लॉन्च केली आहे. ही SUV त्यांच्या फ्लॅगशिप मॉडेलची प्रीमियम आणि धाडसी आवृत्ती असून ती खास भारतीय बाजारासाठी तयार करण्यात आली आहे. SUV ची किंमत आणि डिलिव्हरी डेट यांबाबत सांगायचे तर, नवीन फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइन (Volkswagen Tiguan R-Line) ची सुरुवातीची किंमत ₹48.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, असे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ही गाडी 23 एप्रिल 2025 पासून देशभरातील Volkswagen डीलरशिप्समध्ये उपलब्ध होणार आहे.

नवीन चेसिससह जबरदस्त राइडिंग अनुभव

डिझाइन आणि इंटीरियरमध्ये लक्झरीचा अनुभव

प्रगत तंत्रज्ञान आणि कंफर्ट फीचर्स

Tiguan R-Line मध्ये Ergo Active सीट्स, मसाज आणि अॅडजस्टेबल लंबर सपोर्ट, 3-झोन एअर केअर क्लायमॅट्रॉनिक, Park Assist Plus, आणि दोन स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

शक्तिशाली इंजिन आणि ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी

ही SUV 2.0-लिटर TSI EVO इंजिनसह येते, जी 204 PS पॉवर आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते. ती 7-स्पीड DSG गिअरबॉक्स आणि 4Motion ऑल-व्हील ड्राइव्हसह सुसज्ज आहे. Dynamic Chassis Control (DCC) Pro आणि Vehicle Dynamics Manager (XDS) यांसारख्या फिचर्समुळे कोणत्याही रस्त्यावर स्थिर आणि उत्तम परफॉर्मन्स मिळतो.

सेगमेंट लीडिंग सुरक्षा वैशिष्ट्ये

SUV मध्ये 21 लेव्हल 2 ADAS फीचर्स, 9 एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट व डिसेंट कंट्रोल, आणि फ्रंट व रिअर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. या वाहनाला EURO NCAP 5-स्टार रेटिंग प्राप्त झाली आहे.

इन-कार टेक्नॉलॉजी आणि कनेक्टिव्हिटी

SUV मध्ये 26.04 सेमी डिजिटल कॉपिट, 38.1 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, आणि मल्टी-फंक्शन ड्रायव्हिंग डायल देण्यात आला आहे. IDA व्हॉइस असिस्टंट, Apple CarPlay आणि Android Autoसह Wireless App-Connect चीही सुविधा आहे.

फोक्सवॅगन 4 एव्हर केअर प्रोग्राम

फोक्सवॅगन त्यांचे ४एव्हर केअर एक मानक पॅकेज म्हणून ऑफर करते, ज्यामध्ये ४ वर्षांची वॉरंटी, ४ वर्षांची रोडसाईड असिस्टन्स आणि 3 मोफत सेवांचा समावेश आहे, ज्यामुळे प्रीमियम मालकी अनुभवात मूल्य वाढ होते.

रंग पर्याय आणि कस्टमायझेशन

टिगुआन आर-लाइन सहा प्रीमियम रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:

पर्सिमन रेड मेटॅलिक, सिप्रेसिनो ग्रीन मेटॅलिक, नाईटशेड ब्लू मेटॅलिक, ग्रेनेडिला ब्लॅक मेटॅलिक, ओरिक्स व्हाइट पर्ल आणि ऑयस्टर सिल्व्हर मेटॅलिक.