महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'पिंक ई-रिक्षा योजना' (Maharashtra Pink E Rickshaw Yojana) सुरू केली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने ही योजना राबवली जात असून, Kinetic Green कंपनीच्या 10,000 इलेक्ट्रिक तीनचाकी रिक्षा पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांमध्ये वितरित केल्या जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती रुपाली चाकणकर आणि Kinetic Green चे सहसंस्थापक ऋतेश मंत्री यांच्या हस्ते पुण्यात पहिल्या टप्प्यातील पिंक ई-रिक्षा महिलांना वितरित करण्यात आल्या.
या योजनेत वाहनाच्या एकूण किंमतीवर राज्य सरकारकडून 20% अनुदान दिले जाणार असून लाभार्थींना केवळ 10% रक्कम भरावी लागेल. उर्वरित 70% रक्कम बँकेद्वारे कमी व्याजदरावर कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना सहकार्य करण्यासाठी Kinetic Green कंपनीकडून मोफत वाहन प्रशिक्षण, परवाना मिळवण्यासाठी मदत आणि आठ जिल्ह्यांमध्ये 1,500 हून अधिक EV चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक पिंक ई-रिक्षासोबत पाच वर्षांची वाहन व बॅटरी वॉरंटी, तसेच दर तिमाहीत एक मोफत सेवा असलेला Annual Maintenance Contract (AMC) दिला जाणार आहे. (हेही वाचा, Sex in Bus: नवी मुंबईत चालत्या बसमध्ये सेक्स करताना आढळले जोडपे; व्हिडीओ व्हायरल, कंडक्टरवर कारवाई)
- महिला चालकांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी Kinetic Green कंपनीने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि विविध राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मशी भागीदारी केली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रवासाच्या सेवा देऊन उत्पन्नवाढीला चालना दिली जाईल.
- योजना सुरू करताना Kinetic Green च्या संस्थापक आणि CEO सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, 'पिंक ई-रिक्षा योजना ही हरित ऊर्जा आणि सामाजिक सक्षमीकरण यांचे परिपूर्ण उदाहरण आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मिळावा यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारसोबत ही योजना राबवत आहोत.'
पिंक ई-रिक्षा योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वयंपूर्ण करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, हेच मुख्य उद्देश आहे..! pic.twitter.com/mw3i23cdTD
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 22, 2025
- Kinetic Green चे मोबिलिटी व आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे अध्यक्ष सुधांशू अग्रवाल म्हणाले, 'ही केवळ वाहन वितरण योजना नाही, तर महिलांमध्ये आत्मनिर्भरता आणि सन्मान जागवणारी चळवळ आहे. पिंक ई-रिक्षा म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नव्हे, तर स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि शाश्वत प्रगतीचे प्रतीक आहे.'
‘पिंक ई-रिक्षा योजने’बद्दल माहिती देताना अदिती तटकरे

लाडक्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले "दादा" !

महाराष्ट्राचे लाडके "दादा", उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात "पिंक ई रिक्षा" योजनेची घोषणा केली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजीही त्यांनी घेतली.… pic.twitter.com/LzzLTozjKN
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 22, 2025

ही योजना 20 ते 50 वयोगटातील महिलांसाठी खुली आहे. विधवा, घटस्फोटीत व गरीब महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक Kinetic Green पिंक ई-रिक्षा एक वेळच्या चार्जवर 120 किलोमीटर अंतर कापू शकते. वाहनात ड्युअल सस्पेंशन, ड्युअल हेडलॅम्प, डिजिटल डिस्प्ले आणि 220mm ग्राउंड क्लीअरन्स अशी वैशिष्ट्ये आहेत. चालकासह चार प्रवाशांची आसनव्यवस्था असून हे वाहन 16-ऍम्प होम सॉकेटने चार्ज करता येते. ही योजना राज्य सरकारच्या शाश्वत विकास, महिला समानता आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या धोरणांशी सुसंगत असून, ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांना नवसंजीवनी देणारी ठरणार आहे.