Fawad Khan; Abir Gulaal Poster (Photo Credits: Instagram, IMDb)

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) च्या आगामी 'अबीर गुलाल' 9 मे दिवशी रीलीज होणार होता मात्र आता या सिनेमाला हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता मावळली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडीयातही “Ban Abeer Gulal” हा ट्रेंड पाहायला मिळत होता. भारताकडून आता पाकिस्तान विरूद्ध कडक पावलं उचलली जात असताना PTI ने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार 'अबीर गुलाल' भारतामध्ये प्रदर्शित होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मनसे कडूनही काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात 'अबीर गुलाल' रीलीज न करण्यासाठी इशारा देण्यात आला आहे. त्यांनी फवाद खान च्या बॉलिवूड मधील पुनरागमनाला कठोर विरोध दर्शवला होता. नक्की वाचा: Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा. 

'अबीर गुलाल' सिनेमामध्ये फवाद खान सोबत अभिनेत्री वाणी कपूर झळकली आहे. 9 वर्षांनंतर फवाद बॉलिवूड मध्ये पुन्हा झळकणार होता. मात्र आता या सिनेमाच्या रीलीज ला बंदी घातली जाणार आहे.  दरम्यान वाणी कपूर आणि फवाद खान या दोघांनीही पहलगाम हल्ल्यानंतर शोक व्यक्त केला आहे.

'अबीर गुलाल' भारतामध्ये प्रदर्शित होणार नाही?

22 एप्रिलला पहलगाम मध्ये 26 निष्पाप लोकांना चार दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. यावेळी दहशतवाद्यांनी प्रामुख्याने गैर मुस्लिमांना गोळ्या घातल्या असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी The Resistance Front या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.