
Thai Police Plane Crash: थायलंड (Thailand) मध्ये पोलिसांचे एक छोटे विमान समुद्रात कोसळले (Thai Police Plane Crash). या अपघातात विमानातील किमान पाच जणांचा मृत्यू झाला. रॉयल थाई पोलिसांचे प्रवक्ते आर्चायोन क्रेथोंग यांनी सांगितले की, विमान हुआ हिन जिल्ह्यात पॅराशूट प्रशिक्षणाच्या तयारीसाठी चाचणी घेत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये 'वायकिंग डीएचसी-6 ट्विन ऑटर' विमान समुद्रात कोसळताना दिसत आहे.
विमानातील पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू -
प्रचुआब किरी खान प्रांताच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, विमान हुआ हिन विमानतळाजवळ समुद्रात कोसळले. विमानात असलेले सर्व पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. तथापि, आर्चियन यांनी सांगितले की, अधिकारी विमान अपघाताचे पुरावे गोळा करत आहेत, ज्यात विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटाचा समावेश आहे. (हेही वाचा - Amreli Plane Crash: गुजरातच्या अमरेलीत प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू)
थाई पोलिसांचे विमान समुद्रात कोसळले -
🚨🇹🇭 SMALL PLANE CRASHES INTO SEA NEAR HUA HIN AIRPORT, ATLEAST 5 DEAD
A DHC-6-400 Twin Otter crashed into the Gulf of Thailand off Baby Grande Hua Hin Hotel during takeoff for a parachute drill.
The aircraft carried six people; five were killed, one injured.
The crash… pic.twitter.com/irwGxXsjwH
— Mario Nawfal (@MarioNawfal) April 25, 2025
थायलंडमध्ये मोठा विमान अपघात -
दरम्यान, 11 सप्टेंबर 1998 रोजी थायलंडमध्ये एक मोठा विमान अपघात झाला होता. थाई एअरवेज इंटरनॅशनल फ्लाइट 261 क्रॅश झाल्याने हा अपघात झाला. हे विमान बँकॉकहून सुरत थानीला जात होते. विमानात एकूण 146 लोक होते, त्यापैकी 101 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात थायलंडमधील सर्वात वाईट विमान अपघातांपैकी एक मानला जातो.