Dog | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Rabies Symptoms: रेबीज हा केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करणारा एक प्राणघातक विषाणूजन्य आजार (Rabies Transmission) आहे. हा आजार वेळेवर निदान व उपचार न केल्यास मृत्यू अटळ असतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी 59,000 लोकांचा मृत्यू या आजारामुळे होतो, विशेषतः आशिया व आफ्रिकेत. रेबीज विषाणू ( Rabies Virus) प्रामुख्याने संक्रमित प्राण्याच्या चाव्यांद्वारे (Animal Bites) किंवा ओरखड्यांद्वारे पसरतो. विशेषतः भटक्या कुत्र्यांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे. योग्य लसीकरण व वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णतः टाळता येतो. पाळीव किंवा भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला होण्याचे अनेक प्रकार सर्ऱ्हास घडतात. कुत्रा चावला आहे, त्याला काय होतंय, असं म्हणत अनेकदा दुर्लक्षही केले जाते. पण, हेच दुर्लक्ष तुमच्या मृत्यूस कारण ठरु शकतो. कारण, कुत्रा चावल्यानंतर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर, तुम्हाला रेबिज होऊ शकतो. म्हणूनच जाणून घ्या रेबीज म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे कोणती? प्राणघातक संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय करावे?

रेबीची सुरुवातीची लक्षणं

रेबीजची उद्भवणारी लक्षणं सहसा 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीनंतर दिसू लागतात. सुरुवातीला फ्लू सारखी लक्षणं दिसतात, पण नंतर मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ लागतो. खाली दिलेली लक्षणं वेळेवर ओळखल्यास तातडीने उपचार सुरू करता येतात:

ताप आणि डोकेदुखी

सुरुवातीला ताप, थकवा, अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसतात, जी फ्लूप्रमाणे वाटू शकतात.

चाव्याच्या ठिकाणी जळजळ किंवा खाज

चावलेली किंवा ओरखडलेली जागा जळजळणे, खाज येणे किंवा किरकिरणे ही रेबीजची सुरुवातीची ठळक लक्षणं आहेत.

भीती, अस्वस्थता व संभ्रमावस्था

विषाणू मज्जासंस्थेत प्रवेश करताच मानसिक लक्षणं जसे की भीती, गोंधळ, अस्वस्थता दिसू लागतात.

पाणी पिण्याची भीती (Hydrophobia)

घशातील स्नायूंमध्ये वेदनादायक आकस्मित झटके येतात, ज्यामुळे पाणी गिळणे अवघड होते. त्यामुळे पाणी पाहिल्यावर भीती वाटते.

अतिस्राव (लाळ गळणे)

गिळण्यास अडचण येत असल्यामुळे रुग्णाच्या तोंडातून जास्त लाळ गळते किंवा फेस येतो.

भ्रम, अर्धांगवायू व बेशुद्धावस्था

रेबीजच्या शेवटच्या टप्प्यात भ्रम, झोप न लागणे, अर्धांगवायू, शेवटी बेशुद्ध होणे आणि मृत्यू ओढवतो.

रेबीज होण्याची कारणं

रेबीज टाळण्यासाठी कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे:

प्राण्याच्या चाव्यामुळे संक्रमण

विकसनशील देशांमध्ये 99% प्रकरणांमध्ये कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होते.

ओरखडा किंवा जखमेवर लाळ लागणे

चावा न बसताही जर संक्रमित प्राण्याची लाळ डोळे, नाक, तोंड किंवा उघड्या जखमेवर लागली, तरी रेबीज होऊ शकतो.

विषाणूचे कण श्वासावाटे जाणे (क्वचित प्रसंगी)

प्रयोगशाळेतील काही प्रकरणांमध्ये, हवेतून विषाणू श्वासावाटे शरीरात गेल्याची नोंद आहे.

अवयव प्रत्यारोपणाद्वारे संक्रमण

अतिशय दुर्मिळ असले तरी, काही केसेसमध्ये रेबीज संक्रमित दात्याच्या अवयवांमुळे पसरला आहे.

बिचकां, वटवाघुळांशी संपर्क

विकसित देशांमध्ये वटवाघुळे, रॅकून, लांडगा आणि स्कंक हे देखील रेबीजचे वाहक आहेत.

लवकर कृती केल्यास रेबीजवर मात शक्य

रेबीजवर लक्षणं सुरू होण्यापूर्वी उपचार घेतल्यास हा आजार पूर्णतः प्रतिबंधित करता येतो. जखम धुणं, Post-Exposure Prophylaxis (PEP) घेणं आणि प्राण्यांचं लसीकरण करणं ही यामधील मुख्य प्रतिबंधक पावलं आहेत.

अस्वीकरण (Disclaimer): वरील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय समस्येसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. LatestLY Marathi या माहितीबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाही.