
Mojo Pizza Scam: मुंबईमध्ये झोमॅटो वरून ऑर्डर केलेला पिझ्झा खाल्ल्याने लहान मुलाची प्रकृती ढासळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा पिझ्झा ज्या स्टोअरमधून ऑर्डर करण्यात आला होता, त्या स्टोरवर मनसे नेते सतीश दादा पाटील यांनी धाड टाकली. सतीश पाटील यांनी या स्टोरमधील धक्कादायक प्रकार उघकीस आणला आहे. इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात सतीश पाटील स्टोरमधील अस्वच्छतेबद्दल बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, 'मोजो पिझ्झा यांचा स्टोर म्हणजे अन्नासाठी नाही तर तब्येत बिघडवण्यासाठीच आहे असं वाटतं! झोमॅटो वरून ऑर्डर केलेल्या पिझ्झामुळे एका लहान मुलाची प्रकृती ढासळली, आणि हे लक्षात येताच सतीश दादा पाटील यांनी स्टोरवर धाड टाकली. तिथलं दृश्य म्हणजे अन्नविषबाधेचं जिवंत उदाहरण होतं – खराब भाज्या, कडमडलेलं तेल, घाणेरडं वातावरण! सतीश दादांनी सर्व माहिती बाहेर आणली आणि अशा अन्नद्रव्य विक्रेत्यांना धडा शिकवला. अशा घाण अन्नापासून सावध राहा – आणि घरचं जेवणच खा, असं आवाहनही या पोस्टद्वारे करण्यात आलं आहे.
मनसे नेते सतीश दादा पाटील यांची पिझ्झा स्टोरवर धाड -
View this post on Instagram