
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित Cannes Film Festival मध्ये यंदा चार मराठी सिनेमांचं स्क्रिनिंग होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘खालिद का शिवाजी’, ’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ या तीन सिनेमांची अधिकृत स्क्रिनिंग साठी निवड झाली आहे तर 'जुने फर्निचर' या सिनेमाची स्पेशल स्क्रिनिंग स्लॉट मध्ये निवड झाली आहे. यंदा कान्स फिल्म फेस्टिवल 14 ते 22 मे 2025 दरम्यान रंगणार आहे.
यंदा सिनेमांच्या निवडीसाठी, आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक आणि अपूर्व शालिग्राम यांचा समावेश असलेली एक तज्ञ स्क्रीनिंग समिती स्थापन करण्यात आली होती. Model Sues Cannes Film Festival: कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर मॉडेलसोबत गैरवर्तन; महिलेने दाखल केली तक्रार, नुकसानभरपाई म्हणून 100,000 युरोची मागणी (Watch Video).
कान्स फिल्म फेस्टिवल साठी निवडलेले 4 सिनेमे
स्थळ
स्थळ हा सिनेमा खेड्यातील पारंपरिक विवाह पद्धतेच्या व्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे. दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांच्या 'स्थळ' सिनेमामध्ये लग्नासाठी स्थळ पाहायला येणं, पुढे लग्न जमवण्याची प्रक्रिया यामधून अनेक तरुणींना येणारे अपमानास्पद अनुभव निर्भिडपणे दाखवण्यात आले आहेत.
‘खालिद का शिवाजी’
View this post on Instagram
'खालिद का शिवाजी'ची कथा खालिद नावाच्या एका मुलाभोवती फिरते, जो त्याच्या धर्मामुळे मित्रांमध्ये एकटा पडतो पण तरीही त्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा मिळते. राज मोरे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.
‘स्नो फ्लॉवर’
View this post on Instagram
‘स्नो फ्लॉवर’हा क्रॉसकंट्री सिनेमा आहे. मराठी भाषेतील हा चित्रपट रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा आहे. हा चित्रपट भारतात राहणाऱ्या आजी आणि रशियामध्ये राहणाऱ्या नात यांच्यातील 'अंतर' शोधतो.गजेंद्र विठ्ठल अहिरे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.
जुनं फर्निचर
जुनं फर्निचर हा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित आहे. सिनेमामध्ये स्वतःच्या मुलाला कोर्टात खेचणार्या बापाची गोष्ट आहे.