Rohit Sharma (Photo credit - Twitter)

आशिया कप 2023 चे (Asia Cup 2023) गट सामने संपले आहेत. बुधवारपासून म्हणजेच 6 सप्टेंबरपासून सुपर - 4 चे सामने सुरू झाले. आशिया कपमध्ये पावसामुळे सामना पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. टीम इंडिया सुपर 4 मध्ये पोहोचली आहे. सुपर 4 मध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना 10 सप्टेंबरला पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) आकडेवारी काही खास नाही. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही रोहित शर्माची बॅट शांत होती. मात्र, नेपाळविरुद्ध रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे.

रोहित शर्माचा आर प्रेमदासामध्ये कसा आहे परफॉर्मन्स?

रोहित शर्माने 2008 मध्ये आर प्रेमदासा स्टेडियमवर पहिला सामना खेळला होता. रोहित शर्माने आत्तापर्यंत येथे 9 सामने खेळले आहेत आणि 9 डावात केवळ 24.50 च्या सरासरीने 196 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहित शर्माचा स्ट्राइक रेट 92.89 राहिला आहे. रोहित शर्माने या मैदानावर निश्चितपणे 1 शतक झळकावले आहे आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 104 धावा आहे. रोहित शर्मा या मैदानावर 2017 मध्ये शेवटचा वनडे खेळला होता.

अशी आहेत पाकिस्तानविरुद्धची रोहित शर्माची आकडेवारी

'हिटमॅन' या नावाने प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा 2007 साली पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. रोहित शर्माने आतापर्यंत 17 एकदिवसीय सामने खेळले असून 17 डावात 48.73 च्या सरासरीने 731 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितची सर्वोत्तम धावसंख्या 140 धावा आहे. रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने 22 चेंडूंचा सामना केला आणि 11 धावा करून तो बाद झाला.

आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये रोहित शर्माची कामगिरी 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत. रोहित शर्माने आशिया कपच्या 23 डावांमध्ये 48.82 च्या सरासरीने 830 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा हा वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या बाबतीत टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नावावर 7 अर्धशतके आणि 1 शतक आहे. 2018 साली रोहित शर्माने आशिया कपमध्ये 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप जिंकला.