'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने फलंदाजीने अनेक विक्रमांची निर्मिती केली आहे. आजही अनेक रेकॉर्ड असे आहेत जे अबाधित आहे आणि भविष्यात ज्यांना मोडणे फलंदाजांना कदाचित कठीण होईल. क्रिकेट विश्वात सचिन एक महान फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो एक असा फलंदाज होता ज्याने त्याच्यासारखे व्हावे अशी इच्छा असलेल्या अनेक तरुणांना प्रेरित केले. मास्टर-ब्लास्टर हा आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय फलंदाज आहे. त्याच्या नावावर टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकं आणि धावा असे अनेक विक्रम आहेत. त्याची फलंदाजीची नोंद इतकी उत्कृष्ट आहे की प्रत्येकजण विसरतो की तो एक चांगला गोलंदाज देखील होता. सचिन बॉल स्विंग करू शकणार एक अनोखा गोलंदाज होता आणि तो खेळपट्टीवर अवलंबून फिरकी (लेग आणि ऑफ स्पिन) गोलंदाजी करू शकण्यात सक्षम होता. या दिग्गज क्रिकेटपटूने आपल्या कारकीर्दीत 200 आंतरराष्ट्रीय गडी बाद केले असून यामध्ये कसोटी सामन्यात 44 आणि वनडे सामन्यात 155 विकेटचा समावेश आहे. (ICC ने शेअर केला सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली यांचा अबाधित रेकॉर्ड, मास्टर-ब्लास्टरच्या प्रश्नावर गांगुलीने दिलेल्या प्रतिक्रियेने यूजर्स खुश)
सचिन आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांसह किंवा त्यांच्या विरोधात खेळला आहे. ब्रायन लारा (Brian Lara), टॉम मूडी, माजी पाकिस्तानी कर्णधार इंझमाम-उल-हक, शेन वॉर्न (Shane Warne) सारखे दिग्गज क्रिकेटरही सचिनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले आहेत. एकेवेळी भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे म्हणाले होते की त्यांना सचिनची फलंदाज म्हणून इतकी भीती वाटली नाही जितकी गोलंदाज म्हणून वाटली. "मी सचिनबरोबर 122 कसोटी सामने खेळलो. फलंदाज म्हणून मी त्याच्या जागेवर कधीही धोका निर्माण केला नव्हता परंतु त्याने गोलंदाज म्हणून माझ्या जागेवर धोका निर्माण केला. लेगस्पिन सह तो एक नैसर्गिक होता, "असे कुंबळेने म्हटले.
सचिनच्या बॉलिंगचा हा व्हिडिओ तुमच्या जुन्या आठवणी नक्की ताज्या करतील. पाहा सचिनच्य जादुई बॉलिंगचे 'हे' नमुने:
16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनला गोलंदाज म्हणून पहिली विकेट घेण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेरीस त्याने श्रीलंकाविरुद्ध 1990 सामन्यात रोशन महानमाला बाद करून पहिली विकेट मिळवली.