मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची जोडी आंतरराष्ट्रीय वनडेमधील सर्वात यशस्वी जोडींपैकी एक आहे. दोघांमध्ये एकूण 176 भागीदारी झाल्या आहेत. यावेळी दोघांनी 47.55 च्या सरासरीने 8,227 धावा केल्या. तथापि, दोघांना वनडेमध्ये सध्याच्या नियमांमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती तर त्यांनी आणखी 4,000 धावा केल्या असत्या असे माजी भारतीय कर्णधार गांगुलीचे मत आहे. गांगुली आणि तेंडुलकर यांचा डावा-उजवा संयोजन जगातील सर्वात फायदेशीर होता आणि आयसीसीने (ICC) देखील या भागीदारीचे कौतुक केलं. आधुनिक वनडे नियमांतून आणखी किती धावा करता आल्या असत्या याची चर्चा करून दोन्ही खेळाडूंनी आयसीसीच्या ट्विटर पोस्टला प्रत्युत्तर दिले. सचिन आणि सौरवच्या फोटोबरोबरच आयसीसीने त्यांच्या भागीदारीची काही आकडेवारी ट्विट केली. एकूण 8,227 वनडे धावांच्या सरासरीने आयसीसीने नमूद केले की वनडेमध्ये अजूनही 6000 धावांचा टप्पा पार करणारी आणखी कोणतीही जोडी नाही. ('वाटलं सोशल डिस्टन्सिंग गेलं खड्ड्यात', सचिन तेंडुलकर याने सांगितला पहिल्या 'डेजर्ट स्टॉर्म' चा कधी न ऐकलेला किस्सा)
आजही सचिन-सौरवचा वनडे भागीरदारीचा रेकॉर्ड अतूट आहे. याच आठवण काढत सचिनने गांगुलीला सवाल केला, ज्याच्यावर बीसीसीआय अध्यक्षांनी दिलेले प्रत्युत्तर पाहून त्यांचे चाहते नक्की आनंदी होतील. सचिन म्हणाला, "या फोटोने जुन्या काळात नेलं." वर्तुळाबाहेर चार चेंडूचा नियम आणि 2 नवीन चेंडूसह आपण आणखी किती धावा केल्या असत्या दादी, असा प्रश्नही सचिनने विचारला. यावर सौरव म्हणाला, "4000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा नक्की केल्या असत्या. 2 नवीन चेंडुसह पहिल्या ओव्हरपासून कव्हर ड्राइव्हवरून चौकार मारला असता आणि 50 ओव्हरपर्यंत खेळ तसाच सुरु राहिला असता."
Another 4000 or so ..2 new balls..wow .. sounds like a cover drive flying to the boundary in the first over of the game.. for the remaining 50 overs 💪😊..@ICC @sachin_rt https://t.co/rJOaQpg3at
— Sourav Ganguly (@SGanguly99) May 12, 2020
यूजर्सनेही दोघांच्या विक्रमी भागीदारीचे कौतुक केले.
दादा आणि सचिनची भागीदारी
Do go through the Tweet Below on Dada & Sachin's ODI Partnership Wins. 👇😄 Likes & Rt's appreciated. https://t.co/nmrpv3bSya
— V Shashank (@shashankv76) May 12, 2020
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट जोडी
The best pair in Cricket History ❤❤ pic.twitter.com/ZCnKdEoBAY
— Maharajer Darbare (মহারাজের দরবারে) (@MaharajerD) May 12, 2020
कायमचे मित्र
Friends Forever ♥️ Dada - Sach ♥️ pic.twitter.com/yJwaiD0IkS
— Sachin Tendulkar Trends ™ (@TrendsSachin) May 12, 2020
क्या बात दादा!
Superb Dada!
— ImRohit (@rohitganwani) May 12, 2020
बेस्ट दादा
Dada at his best 😂🤣🔥
— That Cricket Guy 🐼 (@_Vivek_49) May 12, 2020
सचिन आणि सौरव, या जोडीच्या नावावर भारतासाठी पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचीही नोंद आहे. दोघांनी केनियाविरुद्ध 2001 मध्ये पहिल्या विकेटसाठी विक्रमी 258 धावांची भागीदारी केली होती.