सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या कारकीर्दीत अनेक संस्मरणीय डाव खेळले आहेत पण 1998 मध्ये शारजाह (Sharjah) येथे झालेल्या कोका कोला कपमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला डाव त्याचे चाहते कधीही विसरणार नाहीत. सचिनने त्या मैदानावर 3 दिवसात 2 शतकं ठोकली होती. 22 एप्रिल 1998 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात वाळूच्या वादळानंतर (Desert Storm) सचिनने धावांचा वादळी डाव खेळला आणि भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. एका चॅट शो दरम्यान सचिनने वादळा नंतरची परिस्थिती आणि सुधारित लक्ष्याबद्दल आपले मत व्यक्त केले. सचिनला सुधारित लक्ष्यामुळे तो निराश झाला असे वाटले आणि भारताच्या लक्ष्यातून केवळ 9 धावा व 4 ओव्हर कमी केली तेव्हा सर्व गणना ठप्प झाल्या. सचिनने आपल्या तुफानी डावाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला होता, पण त्यापूर्वी सामन्यात शारजाच्या मैदानावर खरोखर एक वादळ आलं होतं. अशा प्रकारचं वादळ पाहण्याची सचिनची पहिलीच वेळ होती, त्यामुळे त्यावेळी काय करावेसे वाटले याबाबतर सचिनने खुलासा केला. ('डेजर्ट स्टॉर्म' जेव्हा सचिन तेंडुलकर ने शारजाहमध्ये शेन वॉर्न ची केली धुलाई, 22 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात निर्माण केली दहशत)
‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना ‘सचिनने या वादळा दरम्यान एकेकाळी सोशल डिस्टन्सिंग’ खड्ड्यात गेलं असं वाटलं असल्याचं सांगितलं. सचिन म्हणाला की, वादळापासून बचाव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याला धरण्यासाठी तो तयार आहे कारण त्याच्यासाठी तो पूर्णपणे नवीन अनुभव होता. सचिन म्हणाला, "हा माझा पहिला अनुभव होता. मी असे डेजर्ट स्टॉर्म कधी पाहिले नव्हते. सर्वप्रथम जेव्हा मी वादळ पाहिलं, तेव्हा मला वाटलं की आता मी उडून जाणार. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर गिलक्रिस्ट माझ्या मागे उभा होता. वादळ इतकं जोरदार होतं की मी असा विचार केला की सोशल डिस्टन्सिंग वैगेरे गेलं खड्ड्यात आणि मी गिलक्रिस्टला धरून राहण्याच्या तयारीत होतो कारण वादळाचा वेग वाढला तर मी आणि गिलक्रिस्ट दोघे मिळून किमान 80-90 किलोचे वजन तरी होईल असा माझा विचार होता, पण तितक्यात अंपरांनी सर्वांना मैदान सोडून आत जाण्यास सांगितलं.”
या सामन्यात सचिनचे शतक भारताला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे नसले तरी यामुळे भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला. फायनलमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने आले. आणि भारताने कांगारूविरुद्ध विजय मिळवत कोका कोला कपचे विजेतेपद मिळवले. दरम्यान, सध्या कोरोना व्हायरसमुळे 'सोशल डिस्टंसिंग' हा शब्द सर्वांना परिचयाचा झाला आहे.