INd vs PAK (Photo Credit - Twitter)

बुधवारपासुन आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळ 238 धावांनी पराभव केला आहे. तसेच यावेळी आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. टीम इंडियाने शेवटच्या वेळी हे विजेतेपद 2018 मध्ये जिंकले होते आणि त्यावेळी देखील ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium) होणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तर पाकिस्तान संघ 11 वर्षांपासून विजयाची वाट पाहत आहे.

टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ पहिल्यांदाच पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. आशिया कप 2023 मधील पाकिस्तानचा हा दुसरा सामना असेल. त्याचबरोबर टीम इंडिया सध्याच्या स्पर्धेत पहिला सामना खेळणार आहे. रोहित आणि कंपनी बुधवारी श्रीलंकेत पोहोचली. (हे देखील वाचा: IND vs PAK Weather Prediction: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित)

टीम इंडियाने पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियमवर आतापर्यंत 3 वनडे सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. टीम इंडियाने या मैदानावर 2012 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला होता ज्यात त्याने यजमान श्रीलंकेचा 20 धावांनी पराभव केला होता. यानंतर, 2017 मध्ये, टीम इंडियाने पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियमवर यजमान संघाविरुद्ध 2 सामने खेळले आणि टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले. या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तान पहिल्यांदाच भिडणार आहेत.

पाकिस्तान संघाने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात 2 सामने जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. पाकिस्तानने 2011 मध्ये पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. यानंतर 2011 आणि 2012 मध्ये पाकिस्तानने या मैदानावर झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचबरोबर या मैदानावर गेल्या दोन सामन्यांत पाकिस्तानचा संघ पराभूत झाला आहे. श्रीलंकेविरुद्धचे शेवटचे दोन्ही वनडे हरले आहेत.

टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी तर 4 सप्टेंबरला नेपाळशी भिडणार आहे. या स्पर्धेत नेपाळचा संघ प्रथमच खेळत आहे. आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 13 सामने झाले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने सात सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने दोन मॅच जिंकल्या आहेत, तर पाकिस्तानने 1 मॅच जिंकली आहे.