IND vs BAN (Photo Credit - Twitter)

मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs BAN Test Series 2024) होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, त्यासाठी टीम इंडियाने (Team India) सरावही सुरू केला आहे. मात्र या सर्व तयारीदरम्यान चाहत्यांनी भारत-बांगलादेश कसोटी मालिका रद्द करण्याची मागणी सुरू केली आहे. त्यामुळे ही मालिका रद्द करण्याची मागणी का होत आहे ते जाणून घेऊया. (हे देखील वाचा: Bangladesh Cricket Team: बांगलादेश क्रिकेट संघावर पैशांचा पाऊस, घरात घूसुन पाकिस्तानला पराभूत केल्याबद्दल मिळाले 'इतके' कोटी रुपये)

 बांग्लादेशमध्ये मोठे सत्तापालट

तुम्हाला माहितच असेल नुकतेच बांग्लादेशमध्ये मोठे सत्तापालट झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडून पळ काढला होता. यानंतर देशात नवीन अंतरिम सरकार स्थापन झाले. सत्तापालट झाल्यापासून हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. याशिवाय हिंदूंच्या संपत्तीची लूट केली जात आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका रद्द करण्याची मागणी चाहते करत आहेत.

असे आहे कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणार आहे. त्यानंतर 27 सप्टेंबरपासून दुसरी कसोटी सुरु होईल, जी ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळवली जाईल. कसोटीनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाईल. 06 ऑक्टोबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 09 सप्टेंबर रोजी होणार आहे. यानंतर 12 ऑक्टोबरला टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.