टीम इंडियाचे 6 स्टार्स वनडेमध्ये 99 धावांवर झाले आऊट, सचिन तेंडुलकर 3 वेळा झाला शिकार, पाहा पूर्ण लिस्ट
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images)

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये शतकी कामगिरी करणे सोपे नाही. आजवर आपणास असे अनेक फलंदाजांना नर्वस नाईंटीचा शिकार होताना पहिले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा आपण नर्वस नाईंटीबद्दल बोलतो तेव्हा आपल्या समोर पहिले नाव येते ते म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulakr). मात्र, जेव्हा एखादा फलंदाज 99 धावांवर आऊट होतो तेव्हा त्याच्या सह चाहत्यांनाही वाईट वाटते. फक्त एका धावणे शतक हूकने कोणत्याही फलंदाजाला आवडत नाही आणि हे भारताच्या अर्ध्या डझन खेळाडूं सोबत झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीत विक्रमी 49 शतक ठोकणारा सचिन 3 वेळा 99 धावा करुन स्वत: पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अशा प्रकारे, त्याची तीन शतके खराब झाली आहेत. पण, हे केवळ त्याच्याबरोबरच घडले नाही तर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या फलंदाजांसह भारतीय संघातील (Indian Team) इतर 5 खेळाडूंसोबतही हे घडले आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) एकदाही 99 धावांवर बाद झाला नाही. (VIDEO: जेव्हा सचिन तेंडुलकर ने आपल्या बॉलिंगच्या जादूने टॉम मूडी, ब्रायन लारा, इंझमाम सारख्या दिग्गजांची उडवली विकेट)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 99 धावांवर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत सचिनचे नाव अव्वल आहे. सचिन सर्वाधिक तीन वेळा 99 धावांवर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या लिस्टमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड 99 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद होणारा तिसरा फलंदाज आहे. या संघात भारतीय संघाचा कर्णधार विराट आणि उपकर्णधार रोहितचेही नाव आहे. विराट आणि रोहित आजवर प्रत्येकी 1 वेळा 99 धावांवर बाद झाले आहेत.  या खेरीज आजवर 99 धावांच्या धावसंख्येवर कोणताही फलंदाज बाद झाला नाही.

दुसरीकडे, सचिनचा रेकॉर्ड मोडणे किंवा त्याच्या जवळ पोहचण्याचा प्रत्येक फलंदाज प्रयत्नशील असतो. पण या स्टार फलंदाजाच्या नावावर एक विक्रमही आहे, ज्याच्या आसपास एखादा क्रिकेटपटू न पोहचण्याचा प्रयत्न करेल. तो आहे नर्वस नाईंटीजचा. सचिन 90 धावा ठोकताच सर्वाधिक नर्वस नाईंटचा शिकार होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक 18 वेळानर्वस नाईंटचा शिकार बनला आहे.