Very Heavy Rain Alert: मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार धुमशान सुरू आहे. अचानक येणार्‍या वादळी वारा, पाऊस आणि सोबतच वीजांचा कडकडाट मुळे मे महिन्यातच पावसांच्या दिवसांचा अनुभव मिळत आहे. यामध्येच आता सायक्लॉन शक्ती मुळे सध्या अरबी समुद्रामध्ये ECMWF मॉडेल च्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा समुद्र किनारी भागाजवळ राहणार आहे. त्यामुळे विकेंडला  किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आता कोकण-गोव्यात (Kokan-Goa) आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)