
Girl Thrashes Boyfriend: मंगळवारी रात्री उशिरा इंदूरच्या क्लिफ्टन कॉर्पोरेट बिल्डिंगजवळ हा प्रसंग घडला. जिथे एक तरूणी तिच्या प्रियकराला तिची फसवणूक करताना पाहिल्यानंतर त्याला चप्पलने मारहाण (Girfriend Boyfriend Fight) करताना कॅमेऱ्यात कैद झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये, ती तरूणी तिच्या प्रियकराला (Boyfriend) लाथा आणि मुक्का मारत होती आणि माफी मागण्यास भाग पाडत होती. मारहाणीनंतर तरूणी इतर दोन मुलांसह दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियकर हा दुसऱ्या मुलीसोब फिरत होता. त्यावरून हा प्रकार घडल्याचे समजते. या सर्व प्रसंगादरम्यान तेथे मोठी गर्दी जमली आणि नंतर काहींनी त्याला कपडे घातले आणि घरी जाण्यास मदत केली. लासुडिया पोलिसांनी घटनेची पुष्टी केली आहे आणि ते तपास करत आहेत. अद्याप या घटनेबाबत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झाली नसस्याचे समोर आले आहे. मारहाणीच्यावेळी इसम दारूच्या नशेत होता.
इंदूरमध्ये भररस्त्यात प्रियकराला मारहाण - व्हिडीओ
View this post on Instagram