मुंबईमध्ये सलमान खान च्या गॅलेक्सी अपार्टमेंट मधील घरात घुसण्याचा एका महिलेने प्रयत्न केला आहे. पोलिसांची नजर चुकवून ही महिला आत शिरली नंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. सध्या तिची चौकशी सुरू आहे. सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशात त्याच्या वैयक्तिक आणि घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र आज एका महिलेने घुसण्याचा प्रयत्न केल्याने त्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
सलमान खानच्या घरी अज्ञात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न
Mumbai | A woman attempting to trespass into Actor Salman Khan's residence at Galaxy apartments arrested by the Police. The Police are questioning the woman: Mumbai Police
— ANI (@ANI) May 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)