CCTV Cameras Smashed: मध्यरात्रीच्या सुमारास, लाठ्या घेऊन सज्ज असलेल्या टोळक्यांच्या गटाने वाराणसीच्या (Varanasi) रस्त्यांवर फिरून शहरातील सुमारे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. या तोडफोडीमुळे शहराच्या सुरक्षिततेबद्दल आणि देखरेखीबद्दल जनतेची चिंता वाढली आहे. या प्रकरणात ऑटोचालकासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन फरार आरोपींना पकडण्याचा पोलीस तपास करत आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तोडफोड का करण्यात आली याचे शोधले जात आहे. हे कृत्य पूर्वनियोजित असल्याचे पोलीसांकडून सांगितले जात आहे. हा हल्ला वैयक्तिक होता की व्यापक गुन्हेगारी कटाचा भाग होता याचा अधिकारी तपास करत आहेत.
मध्यरात्रीत 50 सीसीटीव्ही कॅमेरे फोडले
In a shocking act of vandalism, a group of boys came out with sticks around midnight in Varanasi and broke nearly 50 CCTV cameras installed in the city.
(1/2) pic.twitter.com/nHmBXX4YGF
— The Times Patriot (@thetimespatriot) May 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)