
Gujarat Titans vs Lucknow Super Giants, TATA IPL 2025 64th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 64 वा सामना आज म्हणजेच 22 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल. प्रथम फलंदाजी करताना लखनौने गुजरातला 236 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
That was SENSATIONAL 🥵#GTvLSG live 👉 https://t.co/TT7Eu0r3fM pic.twitter.com/5VIU1K3331
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 22, 2025
या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी आले आणि त्यांची सुरुवात शानदार झाली कारण दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची जलद भागीदारी केली.
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकांत दोन गडी गमावून 235 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून स्फोटक सलामीवीर मिचेल मार्शने 117 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, मिचेल मार्शने 64 चेंडूत 10 चौकार आणि आठ षटकार मारले. मिचेल मार्श व्यतिरिक्त निकोलस पूरनने नाबाद 55 धावा केल्या.
दुसरीकडे, रविश्रीनिवासन साई किशोरने गुजरात टायटन्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. गुजरात टायटन्सकडून रविश्रीनिवासन साई किशोर आणि अर्शद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विश्रिनिवासन साई किशोर आणि अर्शद खान वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकांत 236 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.