
Gujarat Titans vs Lucknow Super Giants, TATA IPL 2025 64th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 64 वा सामना आज म्हणजेच 22 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा - धावांनी पराभव केला आहे. त्याआधी गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल. प्रथम फलंदाजी करताना लखनौने गुजरातसमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 20 षटकात 202 धावा करु शकले.
Match 64. Lucknow Super Giants Won by 33 Runs https://t.co/NwAHcYJlcP #GTvLSG #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकांत दोन गडी गमावून 235 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून स्फोटक सलामीवीर मिचेल मार्शने 117 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, मिचेल मार्शने 64 चेंडूत 10 चौकार आणि आठ षटकार मारले. मिचेल मार्श व्यतिरिक्त निकोलस पूरनने नाबाद 55 धावा केल्या. दुसरीकडे, गुजरात टायटन्सकडून रविश्रीनिवासन साई किशोर आणि अर्शद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विश्रिनिवासन साई किशोर आणि अर्शद खान वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची जलद भागीदारी केली. गुजरात टायटन्स संघाला 20 षटकांत नऊ विकेट गमावल्यानंतर फक्त 202 धावा करता आल्या. गुजरात टायटन्सकडून शाहरुख खानने 57 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान शाहरुख खानने 29 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार मारले. शाहरुख खान व्यतिरिक्त शेरफेन रदरफोर्डने 38 धावा केल्या. त्याच वेळी, विल्यम ओ'रोर्कने लखनौ सुपर जायंट्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. लखनौ सुपर जायंट्सकडून विल्यम ओ'रोर्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. विल्यम ओ'रोर्क व्यतिरिक्त, आवेश खान आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.