Photo Credit- X

New Zealand National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd T20I 2025 Live Scorecard:न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा टी20 सामना आज म्हणजे 18 मार्च रोजी ड्युनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेलकडे आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आगा करत आहे. दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 मध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. न्यूझीलंडच्या प्लेइंग 11 मध्ये काइल जेमिसन आणि टिम रॉबिन्सन यांच्या जागी जेम्स नीशम आणि बेन सियर्स यांना संधी देण्यात आली आहे. तर अबरार अहमदच्या जागी पाकिस्तानच्या प्लेइंग 11 मध्ये हरिस रौफचा समावेश करण्यात आला.

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड येथे आहे.

बेन सीयर्स: किवी संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बेन सीयर्सला संधी देण्यात आली आहे. बेन सीयर्स हा एक वेगवान गोलंदाज आहे. ज्याला 18 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेण्याचा अनुभव आहे. गेल्या सामन्यात काइल जेमीसनने चांगली गोलंदाजी केली. पण त्याला या सामन्यातून वगळण्यात आले.

जेम्स नीशम: किवी संघाने त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये जेम्स नीशमलाही संधी दिली आहे. जेम्स नीशम हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. जो चेंडू आणि बॅटने चमत्कार करू शकतो. नीशमला 79 सामन्यांमध्ये 944 धावा आणि 39 विकेट्स घेण्याचा अनुभव आहे.

हरीस रौफ: अबरार अहमदची जागा हरीस रौफने प्लेइंग 11 मध्ये घेतली आहे. हरिस रौफने 80 टी-20 सामन्यांमध्ये 21.27 च्या सरासरीने 110 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, तो या सामन्यात शाहीन आफ्रिदीसोबत पाकिस्तानी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सेफर्ट, फिन अॅलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरी फॉल्क्स, जेकब डफी, ईश सोधी, बेन सियर्स

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसन नवाज, सलमान आगा (कर्णधार), इरफान खान, शादाब खान, अब्दुल समद, खुशदिल शाह, जहांदाद खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद अली