
भारतीय संघाचा (Indian Team) यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सध्याच्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. आणि अगदी कमी काळात त्याने संघाचा प्रमुख गोलंदाज असण्याचा मन देखील पटकावला आहे. आपल्या गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीने त्याने प्रत्येक चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध आजी-आजोबां पर्यंत सर्वजण त्याच्या गोलंदाजीच्या शैलीचे अनुसरण करताना दिसतात. अवघ्या काही तासांपूर्वी एक आज्जीबाई बुमराहच्या यॉर्कर आणि रनअपची कॉपी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या या अनोख्या गोलंदाजीच्या शैलीनं त्यांनी सर्वांची मन जिंकत आहे. (जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आजीबाई फिदा; बॉलिंग आणि रनअप चे केले अनुसरण अनुकरण, पहा Video)
दरम्यान, बुमराहच्या या शैलीची आजींनी केलेली अचूक नक्कल पाहत स्वतः टीम इंडियाच्या या प्रभावी गोलंदाजानी देखील याबाबत दाखल घेतली आहे. बुमराह याने या आजींचा व्हिडिओ पहिला आणि विनम्रतेने रिप्लाय देखील केल. "या आजींनी माझा दिवस बनवला", बुमराह म्हणाला.
याआधी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात एक लहान मुलगा बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसला होता. दरम्यान, विश्वचषकमध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर बुमराहने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती. यात तो म्हणाला, '' माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि सर्व चाहत्यांचे आभार मानतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला.''