जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आजीबाई फिदा; बॉलिंग आणि रनअप चे केले अनुसरण अनुकरण, पहा (Video)
(Photo Credit: Shanta Sukkubai/Twitter)

भारतीय संघाचा (Indian Team) यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jaspri Bumrah) याने आपल्या गोलंदाजीने सर्वांच्या मनावर छाप सोडली आहे. बुमराहची गोलंदाजी करण्याची स्टाईल लहान मुलांपासून अगदी वृद्ध लोकांना देखील पसंत पडली आहे. बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्यांच्या भन्नाट किस्स्याची भर पडली आहे. आणि आता नुकताच अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई बुमराच्या विचित्र रनअपची नक्कल करताना दिसत आहे. या आजीबाईंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वैराळ होत आहे. (विश्वचषकमध्ये पराभवानंतर भारतीय संघात फूट; विराट कोहली आणि रोहित शर्मा गटात विभाजित झाली टीम इंडिया)

यंदाच्या विश्वचषकात बुमराहने अत्यंत भेदक मारा करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले. त्यात बुमराहचा विचित्र रनअप नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. आजवर जगातल्या अनेक छोट्या मुलांनी बुमराह सारखी गोलंदाजी कर्णाचा प्रयत्न केला. काही यशस्वी झाले तर काही अजून पर्यंत चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. पहा या आज्जीबाईंचा हा भन्नाट व्हिडिओ:

दरम्यान, यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये बुमराहने 9 सामन्यात 18 विकेट्स घेतले आहे. विश्वचषकमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलिया च्या मिशेल स्टार्क याने 27 विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावले आहे.