आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा (Indian Team) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभव झाला आणि शेकडो भारतीयांचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात आघाडीचे तिन्ही फलंदाज- रोहित शर्मा (Rohit Sharma), के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) प्रत्येकी एक धाव करत बाद झाले तर मधली फळी देखील चांगली कामगिरी बजावत आली नाही. त्यानंतर माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी सूत्रे आपल्या हातही घेतली पण ऐन मोक्याच्या क्षणी आपली विकेट गमावून बसले. आणि आता टीम इंडियाच्या या पराभवानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याचे वृत्त समोर येत आहे. (धक्कादायक! क्रिकेट खेळताना चेंडू डोक्याला लागल्याने जम्मू-काश्मीरच्या 17 वर्षीय जहागिर अहमद याचा मैदानावरच मृत्यू)
भारतीय संघात एक गट आहे जो एकमेकांवर पराभवाचे खापर फोडत आहेत तर काही जण पराभवासाठी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना जबाबदार धरत आहेत. दुसरे कोहलीवर रागावले आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार भारतीय संघात दोन गट पडले आहेत. एक गट उपकर्णधार रोहित सोबत आहे, तर दुसरा गट कर्णधार विराट सोबत आहे. जे खेळाडू विराटला आवडतात त्यांचे संघातील स्थान निश्चित असते. पण रोहित सोबत असणाऱ्या संघात स्थान असेलच असे नाही. रोहित आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. पण विराट सोबत असणाऱ्या खेळाडूंना हा नियम लागू होत नाही. राहुल हे याचे एक उद्धरण आहे. राहुल याची कामगिरी कशी ही असली तरी त्याला संघात स्थान दिले जाते.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहता कोहली आणि रोहित यांच्यात बोलणं बंद झाल्याचे दिसून येत आहे. सामना संपल्यावर कोहलीने सर्वांची भेट घेतली मात्र, रोहितच्या जवळ येताच विराट त्याच्या पाठीमागून निघून गेला आणि रोहित त्याच्या जागेवर तसाच उभा होता.