क्रिकेटच्या मैदानावरून एक अत्यंत दुःखत बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) च्या एक युवा फलंदाजांचा खेळताना डोक्याला चेंडू लागल्याने मैदानावरच मृत्यू झाला आहे. दक्षिण काश्मीर येथे अनंतनागमधील बारामुला (Baramulla) आणि बडगाम (Budgam) यांच्यातील सामन्यावेळी फलंदाजाचा चेंडू डोक्याला लागून जागीच मृत्यू झाला. या खेळाडूचे नाव नाव जहागिर अहमद वार (Jahangir Ahmed War) आहे आणि तो 17 वर्षाचा होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार जहांगिर बाउन्सरवर फटका मारत असताना चेंडू थेट डोक्यावर आदळला ज्यामुळे तो मैदानवरच कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयाच नेण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
जहांगीर बारामुला क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज होता आणि तो 11 वी मध्ये शिकत होता. दक्षिण काश्मिरमधील गोशबाग इथं राहणाऱ्या या खेळाडूच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आजवर कित्येक क्रिकेटपटूंचा चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फिलिप ह्युजेसचा अशाच पद्धतीने मैदानावर मृत्यू झाला होता. तर भारताचे माजी क्रिेकेटपटू रमण लांबा यांचाही मृत्यू चेंडू डोक्यात लागून झाला होता. दुसरीकडे, खेळाडूच नाही तर वेल्समध्ये एका क्लब सामन्यात अंपायरच्या डोक्यात चेंडू लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.