
आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर फेरीचा सामना रविवार 10 सप्टेंबर 2023 रोजी आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळवला जाईल. गटातला सामना पावसामुळे रद्द झाला. अशा परिस्थितीत रविवारी हा शानदार सामना होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केला आहे. पावसाने खेळात व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. दरम्यान, टीव्ही आणि ओटीटी वर भारत विरुद्ध पाकिस्तान मेगा मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग केव्हा आणि कुठे पहायचे ते जाणून घ्या. (हे देखील वाचा: IND vs PAK Asia Cup 2023 Pitch Report: भारत विरुद्ध पाकिस्तान रोमांचक सामन्यात कोण असेल वरचढ, गोलंदाज की फलंदाज? येथे जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)
स्टार स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी या चॅनेलवर कोलंबो येथून भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर फोर सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. याशिवाय तुम्ही हा शानदार सामना डीडी स्पोर्ट्स आणि डीटीएचवरही पाहू शकता. जर तुम्हाला हा सामना ओटीटी मध्ये पाहायचा असेल, तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. यासाठी कोणत्याही वर्गणीची गरज भासणार नाही. तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता. नाणेफेक दुपारी 2.30 वाजता होईल आणि पहिला चेंडू दुपारी 3 वाजता टाकला जाईल.
आशियाई क्रिकेट परिषदेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'आशिया चषक 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 10 सप्टेंबर 2023 रोजी आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कोलंबो येथे खेळवला जाईल. खराब हवामानामुळे खेळ रद्द झाल्यास हा सामना 11 सप्टेंबर 2023 रोजी खेळवला जाईल. ज्या ठिकाणी पहिला दिवस रद्द झाला होता, त्याच ठिकाणाहून सामना सुरू होईल. तिकीटधारकांना सामन्याची तिकिटे सुरक्षितपणे ठेवण्याचा सल्ला दिला जातो, ते राखीव दिवशीही वैध असतील.