IND vs ENG 2nd Test 2021: Michael Vaughan यांची चेपॉक खेळपट्टीवर टीका, शेन वॉर्नच्या प्रतिक्रियेने झाली बोलती बंद, पहा Tweet
शेन वॉर्न आणि माइकल वॉन (Photo Credit: Facebook)

IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरील (MA Chidambaram Stadium) खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी एकदम वळण घेणारी असल्याचे सिद्ध झाले. मोईन अलीने (Moeen Ali) दुसऱ्या दिवशी 2 विकेट घेत भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आणला, अश्विनने (Ashwin) 5 घेत यजमान टीम इंडियाला सामन्यात भक्कम आघाडी मिळवून दिली. पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह दोन विकेटही घेतल्या. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 134 धावांवर आटोपला आणि भारताला 195 धावांची आघाडी मिळाली. यादरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) ट्विटरवर लिहिलं की, खेळपट्टीने कसोटीला रोमांचक बनवलं आहे, पण खेळपट्टी 5 दिवसाच्या सामन्यासाठी तयार केलेली नाही. "हे क्रिकेट मनोरंजक आहे कारण सर्व वेळी गोष्टी घडत आहेत पण खरं सांगायला तर की ही पिच एक धक्कादायक आहे. भारत अधिक चांगला झाला आहे म्हणून कोणतेही सबब सांगत नाही परंतु ही कसोटी सामना 5 दिवसाची तयार केलेली खेळपट्टी नाही," वॉनने लिहिले. (IND vs ENG 2nd Test Day 2: अश्विनचा ‘पंच’! दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड; Chepauk वर इंग्लंड पहिल्या डावात 134 धावांवर तंबूत)

त्याला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नने (Shane Warne) आपल्या प्रतिक्रियेने माजी इंग्लिश कर्णधारासी बोलती बंद केली. “यापेक्षा पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते, कारण त्याने पहिल्या 2 दिवसात काहीही केले नाही. मग फुटली. ही पहिल्या चेंडूपासून वळण घेणारी बनली. इंग्लंडने भारताला 220 धावांवर बाद केले पाहिजे होते. फिरकी किंवा सीम बॉलिंगमध्ये काही फरक नाही आणि रोहितने या खेळपट्टीवर कसे खेळायचे ते दाखवून दिले."

परंतु चर्चा तिथेच संपली नाही. वॉनने यावर उत्तर देत त्वरित लिहिले की, "2 सत्रांइतके ते जवळपास कुठेही झाले नाही... फिरवले पण हे आता काय करत आहे हे आवडत नाही... पहिल्या कसोटी सामन्यात अशी काही फलंदाजी केली असती तर भारताने पहिली कसोटी सामना अनिर्णीत केला असता... ही चांगली कसोटी सामन्याची खेळपट्टी नाही." वॉर्नने वॉनला प्रत्युत्तर दिल्याने वाद आणखी वाढला. "बॉल सीमिंग/स्पिन करणे यात बरेच काही यात फरक नाही. आम्हाला नेहमीच बॅट/बॉल दरम्यान चांगली स्पर्धा हवी असते. या सामन्यात भारताने इंग्लंडपेक्षा फलंदाजी केली आणि गोलंदाजी केली - सोपे.बॉल वनपासून दोन्ही बाजूंसाठी परिस्थिती समान आहे. पण हे बॉलच्या बाजूने जास्त आहे.”

दरम्यान, भारताच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर यजमान संघाने 86 धावांवर 5 विकेट गमावल्या आहेत. मात्र, सामन्यात यजमान संघाचे पारडे जड दिसत आहे. संघाने दुसऱ्या डावात सध्या 292 धावांची आघाडी घेतली आहे.