ICC ने मंगळ ग्रहावर तयार केली क्रिकेटची खेळपट्टी, Netizens ने लगावले फ्री हीट्स, पहा हसून लोटपोट होणारे कमेंट्स
(Photo Credit: Twitter/ICC)

अमेरिकन अंतराळ संशोधन संख्या म्हणजेच नासाच्या (NASA) ‘पर्सिव्हिअरन्स’ने (Perseverance rover) 12 फेब्रवारी रोजी मंगळावर यशस्वीरित्या लॅण्डींग केलं.  यानंतर जगभरातून नासाच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (International Cricket Council) लाल मातीवर क्रिकेटच्या संभाव्यतेचा इशारा करीत ऐतिहासिक मिशनवर हटके ट्विट पोस्ट केलं. ‘पर्सिव्हिअरन्स’च्या मार्स (Mars) लॅण्डिंगचा काल्पनिक फोटो ट्विट करत आयसीसीने स्टम्प रोवलेलं क्रिकेटचं पीचही दाखवण्यात आलं आहे. कॅप्शनमध्ये, “क्रेकट हे आऊट ऑफ दिस वर्ल्ड आहे, हे आम्ही आधीपासूनच म्हणत आलो आहोत,” असं आयसीसीने म्हटलं. तसेच या ट्विटमध्ये “वीन द टॉस अॅण्ड…” असा प्रश्नही आयसीसीने (ICC) नासाला टॅग करुन विचारला आहे. सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान भारतीय खेळपट्ट्यांवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला याचा फायदा घेत चाहत्यांनी आयसीसीच्या या ट्विटवर फ्री-हिट लगावले आणि मजा लुटली. (नासाच्या Perseverance Rover चे मंगळावर यशस्वी लँडिंग; प्राचीन जीवसृष्टीचा करणार अभ्यास, पहा फोटोज)

आयसीसीच्या या हटके ट्विटवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी भारतीय विकेट्सवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आणि दोन विकेट्सची तुलना केली. रविचंद्रन अश्विनला पुन्हा एकदा मंगळावर मास्टरक्लास खेळ करेल असे बर्‍याच नेटकऱ्यांनी म्हटले तर, तर इतरांनी अभिमानाने ठामपणे सांगितले की जडेजा आणि अश्विनला या खेळपट्टीवर कोणी खेळू शकणार नाही.

पहा आयसीसीच्या ट्विटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

वॉन खेळपट्टीवर टीका करेल

या दोघांना कोणी खेळू शकणार नाही!

हेलिकॉप्टर शॉट्स!

इंग्लंडने बनवली असणार खेळपट्टी

भारतीय क्युरेटर आधीपासूनच मंगळावर आहेत

नाणेफेक जिंका आणि…

पीच रिपोर्ट!

'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या क्युरिओसिटी रोव्हरने ग्रहाच्या पृष्ठभागाचा एक व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला होता. या व्हिडीओत मंगळ ग्रहावरील 'डेविल डस्ट' दर्शविणारा एक आकर्षक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मंगळावरील चक्रीवादळाचा हा व्हिडीओ आहे. 9 ऑगस्ट रोजी नासाच्या क्युरियोसिटी रोव्हरने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. हे रोव्हर मंगळ ग्रहावरील गॅल क्रेटरचा शोध 2012 पासून घेत असून मंगळवारचं हे विवर शोधणं पुढच्या संशोधनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.