Happy Birthday Rahul Dravid: हॉकी चाहता राहुल द्रविड बनला क्रिकेटर, 'या' कारणामुळे ऑस्ट्रेलियाई दिग्गजने दिले 'The Wall' टॅग, जाणून घ्या 'Mr Reliable' संबंधित काही मजेदार गोष्टी

टीम इंडियाचा 'द वॉल' (The Wall) म्हणून प्रसिद्ध असलेला माजी फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करीत आहे. द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी इंदूर येथे झाला होता. 1996 मध्ये श्रीलंकाविरूद्ध सिंगर्स कपमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा फलंदाज टीम इंडियाचे (India) मिस्टर रिलायबल आणि 'वॉल' म्हणून ओळखले जाते. द्रविडचा जन्म इंदोरमध्ये झाला होता, परंतु त्याचे कुटुंब नंतर कर्नाटकात स्थायिक झाले. द्रविडने वयाच्या 12 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आणि नंतर इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर द्रविडने माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1996 मध्ये त्याने पदार्पण केल्यानंतर द्रविड संघाचे मुख्य सदस्य बनले. या वैशिष्ट्यामुळे द्रविडला 'वॉल' आणि 'मिस्टर रिलायबल' नावे मिळाली. द्रविडची प्रतिमा विकेटवर अँकर घालून एक मोठा डाव खेळणाऱ्या फलंदाजांची होती. यामुळेच अनेक क्रिकेट विश्वातील अनेक गोलंदाजांनी द्रविडला बाद करणे सर्वात कठीण फलंदाज मानले आहे.

द्रविडने अनेक सामन्यात विजय मिळविणारा डावदेखील खेळला. आज त्याच्या वाढदिवशी त्याच्याशी संबंधित काही अज्ञात पण मजेदार गोष्टी जाणून घेऊया...

1. टीम इंडियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार्‍या सर्व संघांविरुद्ध शतक ठोकण्याचा अनोखा विक्रम नोंदवला आहे. द्रविडने 2004 मध्ये बांग्लादेशविरूद्ध शतक ठोकत हा इतिहास रचला होता. द्रविडने 164 टेस्ट सामन्यात 52.31 च्या सरासरीने 13288 धावा (36 शतकं, 63 अर्धशतकं) केल्या. तो राज्यस्तरीय हॉकीपटूही राहिला आहे.

2. 11 जानेवारी 1973 रोजी जन्मलेल्या राहुल द्रविडचे टोपणनाव 'जॅमी' आहे. त्याच्या नावामागील कथा बर्‍यापैकी मजेदार आहे. राहुलचे वडील एका 'किसान' कंपनीत काम करायचे, जी जॅम बनवायची. आणि त्यांनी राहुलला जॅमी बोलवायला सुरुवात केली.

3. द्रविड जगातील एकमेव खेळाडू आहे जो पदार्पणाच्या सामन्यातूनच निवृत्त झाला. द्रविडने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यात पदार्पण केले आणि याच सामन्यातून त्याने टी-20मधून निवृत्ती जाहीर केली.

4. द्रविड विरोधी संघाविरुद्ध 'वॉल'सारखे खेळपट्टीवर टिकून संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू मानला जायचा. राहुलचा डिफेन्स इतका मजबूत होता कि त्याची विकेट घेण्याची इच्छा सर्वांनाच व्हायची. याच कारणामुळे माजी ऑस्ट्रेलियाई खेळाडू स्टीव्ह वॉ यांनी द्रविडला 'द वॉल'चे टॅग दिले.

5. 2004 मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध 270 धावांची शानदार खेळी तर 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडिलेड मैदानावर 233 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. या दोन्ही कसोटींमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठीचे द्रविडचे योगदान विसरता येणार नाही.

6. जॅमीने कसोटी क्रिकेटमध्ये 31258 चेंडू खेळले आहेत जो की एक विक्रम आहे. आजवर कोणताही फलंदाज 30000 चेंडूही खेळू शकलेला नाही.

7. द्रविडने क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्रदान केले आहेत.

8. नोव्हेंबर 2003 मध्ये, द्रविडने हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 22 चेंडूत 50 धावा केल्या. त्यावेळी अजित आगरकर नंतर हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले.

9. द्रविड कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात भारताने सलग 14 कसोटी सामने जिंकले. वनडे सामन्यात त्याचा विजयाची टक्केवारी 62.16 होती.

10. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर याच्यानंतर द्रविड दुसऱ्या स्थानावर आहे. राहुलने 164 टेस्ट सामन्यात 13288 धावा केल्या. यासह टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा विक्रमही राहुलचा नावावर आहे.

जेंटलमॅन ऑफ क्रिकेट म्हणून ओळखले जाणारा द्रविड कठीण परिस्थितीतही विरोधी संघासमोर भिंतीसारखा उभा राहून सामना जंकवून देणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. निवृत्तीनंतर त्याने भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिले आणि आता सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद सांभाळत आहे.