रवि शास्त्री (Photo Credits: Getty Images)

‘गुगल’ (Google), या सर्च इंजिनवर अगदी लहानसहान गोष्टीपांसून ते मोठमोठ्या गोष्टींबाबत माहिती उपलब्ध असते. परंतु कधी-कधी याच गुगलवर चुकीच्या गोष्टीही घडताना दिसल्या आहेत. याचे उदाहरण सांगायचे झाले तर, अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खानची पत्नी म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव दाखवण्यता आलं तर टीम इंडियाचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिलची पत्नी सर्च केल्यास सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिचं नाव समोर येत. अशाच प्रकारे गुगलकडून पुन्हा एक मोठी चूक झाली आहे आणि ती भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांच्याबाबत आहे. गुगलवर 'Ravi Shastri Age' असे सर्च केल्यास माजी टीम इंडिया (Team India) फलंदाजाचे वय 120 वर्ष दाखवत असल्याने नेटकरी हैराण झाले आहेत. (Shubman Gill's Wife: शुबमन गिल ची बायको सर्च करताच गूगल दाखवते सारा तेंडुलकरचे नाव; जाणून घ्या त्या मागचे कारण)

हा सर्व गोंधळ शास्त्री यांच्या जन्माच्या वर्षात विकिपीडियामध्ये झालेल्या बदलांमुळे झाला असावा असे मानले जात आहे. शास्त्री यांच्या विकिपीडिया पेजवर नजर टाकल्यास आपल्याला आढळेल की ते देखील त्यांचे वय 120 वर्ष दर्शवत आहे. विकिपीडियाने शास्त्रींच्या जन्म तारखेत बदल करून त्यांचा जन्म 27 मे, 1900 रोजी झाला असल्याचे दाखले ज्यमुळे विकियापीडिया बरोबर गुगलवरही त्यांचे वय 120 दिसत आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, प्रशिक्षक शास्त्री यांचे खरे वय 59 वर्षे आहे आणि 27 मे, 1962 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. 11 जुलै, 2017 रोजी त्यांची टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली. शास्त्री यांच्या क्रिकेट कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्यांनी फेब्रुवारी 1981 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तर डिसेंबर 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

रवि शास्त्री वय (Photo Credit: Google/ScreenShot)

शास्त्रींनीं भारताकडून 150 वनडे सामने खेळले असून 129 विकेट्स घेतल्या असून 4 शतकांसह 3108 धावा केल्या आहेत. शिवाय, त्यांनी 80 कसोटी सामन्यात 151 विकेट्स आणि 3830 धावा काढल्या आहेत. टीम इंडिया प्रशिक्षक होण्यापूर्वी ते भाष्यकर्ता होते ज्यात त्यांनी चांगली प्रसिद्धी मिळवली. 2011 आयसीसी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातही त्यांनी कमेंट्री केली होती ज्यात टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करून 28 वर्षानंतर विजेतेपद पटकावले होते.