Shubman Gill's Wife Google Search Shows Sara Tendulkar: शुबमन गिल ची बायको सर्च करताच गूगल दाखवते सारा तेंडुलकरचे नाव; जाणून घ्या त्या मागचे कारण
Google shows Sara Tendulkar as Shubman Gill's wife (Photo Credits: Instagram)

तुम्ही कधी शुबमन गिल (Shubman Gill) बायको असे गूगल सर्च केले आहे ? केले नसेल तर करा आणि त्याचे उत्तर तुम्हाला सारा तेंडुलकर असे दिसेल तर आश्चर्य चकीत होऊ नका. अर्थात ही खरी माहिती नाही हा सर्च इंजिन मधला गोंधळ आहे.पण आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की गूगल साराच नाव या सर्च मध्ये का दाखवत आहे. २१ वर्षीय क्रिकेटर शुबमन गिल जो आता IPL मध्ये कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) या टीम मधून खेळत आहे.तो आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. अर्थात त्याचे काहीही ठोस पुरावे नाहीत पण त्या दोघांची नावे जोडली जात होती.

शुबमनला आज ही सारा तेंडुलकरचा प्रियकर म्हटले जाते. क्रिकेटर हार्दिक पांड्या ने ही एकदा शुबमन या गोष्टीवरून चिडवले होते. शुबमन ने त्याचा आणि सारा चा एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला होता आणि त्याच फोटोने हार्दिक पांड्याचे लक्ष वेधले होते. सारा ने एकदा शुबमन ला त्याने घेतलेल्या नवीन कारबद्दल अभिनंदन  केले होते आणि कमेंट मध्ये ब्लॅक हार्ट इमोजी  ही टाकला होता. आणि सारा च्या या कमेंटवर शुबमन ने ही एक दूसरा हार्ट इमोजी पोस्ट करत त्याचा रिप्लाय दिला होता. याच गोष्टीवरून हार्दिक पांड्या ने शुबमन ची मस्करी करत  'most welcome from her' असे लिहित शुबमन ला चिडवले होते.त्यांनातर शुबमन आणि सारा च्या नात्यावर चर्चा होऊ लागली.

Photo Credit : Instagram

गूगल वर शुबमन ची बायको सारा दिसत असण्याचे हे ही एक कारण असू शकते. या आधीही गूगल च्या सर्च मध्ये राशिद खान ची बायको बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीचे नाव दिसत होते.आणि आता क्रिकेटर शुबमन गिल ची बायको सारा तेंडुलकर हीचे नाव पहायला मिळत आहे.