BMC Election Results live news marathi

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC) पार पडलेल्या मतदानानंतर आज, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अवघ्या काही तासांत मुंबईचा नवा 'महापौर' कोणत्या पक्षाचा असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. या हाय-व्होल्टेज निवडणुकीच्या निकालांकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

थेट प्रक्षेपण (Live Streaming) कुठे पाहायचे?

Live News Marathi- मुंबईकरांना आणि जगभरातील मराठी प्रेक्षकांना निकालांचे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मराठी न्यूज चॅनेल्स जसे की एबीपी माझा (ABP Majha Live), टीव्ही९ मराठी (TV9 Marathi), मुंबई तक (Mumbai Tak) आणि झी २४ तास (Zee 24 Taas) यांच्या यूट्यूब चॅनेल्सवर निकालांचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) विनामूल्य उपलब्ध आहे.

ABP Majha Live

TV9 Marathi

Zee 24 Taas

Mumbai Tak

याशिवाय, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील 'हॅशटॅग #BMCElection2026' द्वारे रिअल-टाइम अपडेट्स मिळवता येतील

मतमोजणीची जय्यत तयारी

Election Results Today Maharashtra- मुंबईतील 227 जागांसाठी एकूण 23 केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. प्रत्येक केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. यंदा मतमोजणीच्या पद्धतीत काही तांत्रिक बदल केल्यामुळे पूर्ण निकाल हाती येण्यास थोडा उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2026 ची ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (शिवसेना उबाठा-काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. 74 हजार कोटींहून अधिक बजेट असलेल्या या पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.