मुंबई: आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026 चा थरार आजपासून (15 जानेवारी) सुरू होत आहे. गतविजेता आणि पाचवेळा विश्वचषक जिंकणारा भारतीय युवा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या (USA) सामन्याने करणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अमेरिकेच्या नवख्या संघासमोर बलाढ्य भारताला रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
सामन्याचे वेळापत्रक आणि ठिकाण भारत आणि अमेरिका यांच्यातील हा अ गटातील (Group A) सामना झिम्बाब्वेमधील बुलावायो येथील 'क्वीन्स स्पोर्ट्स क्लब'वर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.00 वाजता या सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक (Toss) दुपारी 12.30 वाजता होणार आहे.
भारत विरुद्ध अमेरिका सामना टीव्हीवर थेट प्रक्षेपण कोठे पाहणार?
and TV Telecast Details: भारतातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क'वर (Star Sports Network) घेता येईल. स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर हा सामना थेट प्रसारित केला जाणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी 'जिओ हॉटस्टार' (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. प्रेक्षकांना मोबाईलवरही या हाय-व्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवता येईल.
भारत 19 वर्षांखालील क्रिकेट संघ विरुद्ध युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 19 वर्षांखालील क्रिकेट संघ- भारतीय संघातील मुख्य खेळाडू भारतीय संघात अनेक प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार आयुष म्हात्रेसह युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. वैभवने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. याशिवाय विहान मल्होत्रा आणि मोहम्मद एनान यांसारख्या खेळाडूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
स्पर्धेचे स्वरूप या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी झाले असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारताचा समावेश असलेल्या गटात न्यूझीलंड आणि बांगलादेश यांसारखे तगडे संघही आहेत. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ 'सुपर सिक्स' फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघ या विजयाने स्पर्धेची दणक्यात सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.