ENG vs NZ, World Cup 2019 Final: इंग्लंड संघाला विजयाचा मान दिल्याने आईसीसी वर्ल्डकपच्या नियमांवर प्रश्नचिन्ह; गौतम गंभीर, युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांनी व्यक्त केले मत
World Champion Team England. (Photo Credits: Getty Images)

ENG vs NZ, World Cup 2019 Final: आईसीसी वर्ल्डकप 2019 (ICC World Cup) चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) इंग्लंड (England) विरुद्ध न्युझीलंड (New Zealand) संघामध्ये खेळवण्यात आला. तर दोन्ही संघात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाला विश्वविजेता संघ म्हणून घोषित करत त्यांना वर्ल्डकपचा मान दिला गेला. मात्र आईसीसीच्या या निर्णयावरुन आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरंतर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडचा सामना दोन वेळा बरोबरीचा झाल्याने आईसीसीने विश्वविजेता संघ कोणाला ठरवायचे यासाठी एक निर्णय दिला. या निर्णयात जो संघ जास्तीत जास्त षटकार आणि चौकार मारणार तो संघ विश्वविजेता कपचा मानकरी ठरणार असे म्हटले. आईसीसीच्या नियमांचे पालन करुन दोन्ही संघाने सुपर ओव्हरमध्ये आपली उत्तम खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर इंग्लंडच्या संघाला वर्ल्डकपची ट्रॉफी देण्यात आली. अशा प्रकारे इंग्लंडच्या संघाने प्रथमच वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

मात्र भारतीय खेळाडू गौतम गंभीर, युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांनी आईसीसीने घोषित केलेल्या विश्वविजेता संघासाठी वर्ल्डकपच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. तसेच या खेळाडूंनी आपले मतसुद्धा ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने असे म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या सामन्याचा निकाल हा कोणत्या संघाने षटकार आणि चौकार कोणी किती केले याच्यावरुन ठरवण्यात आला. तर आईसीसीचा हा नियम एकदम विक्षिप्त आहे. मात्र तरीही मी दोन्ही संघाला उत्तम खेळी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. दोन्ही संघ विश्वविजेता आहे.

तर युवराज सिंग याने आपले मत व्यक्त करत ट्वीट करत म्हटले आहे की, आईसीसीच्या या नियमासोबत मी सहमत नाही. परंतु नियम हा नियम असला तरीही इंग्लंड संघाचे अभिनंदन. मात्र किवी यांनीसुद्धा शेवटपर्यंत उत्तम खेळी करण्याचा प्रयत्न केला.

रोहित शर्मा याने म्हटले की, क्रिकेट मधील काही नियम अत्यंत गंभीर्याने घेतले पाहिजेत.

(ENG vs NZ, World Cup 2019 Final: किवी कर्णधार केन विल्यमसन याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान)

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडचा वर्ल्डकपचा सामना अटीतटीचा ठरला. मात्र सुरुवातीला फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने 50 शतकात 241 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघानेसुद्धा 50 शतकात 241 धावा केल्या. यामुळे दोन्ही संघात बरोबरीचा सामना झाल्याने सुपरओव्हर खेळवण्यात आली. मात्र अखेर सुपरओव्हरमध्ये इंग्लंडच्या संघाने विश्वविजेता कपवर आपले नाव कोरले.