न्यूझीलंड संघ (Photo Credit: BlackCaps/Twitter)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक आता संपुष्टात आले आहे. क्रिकेटच्या प्रतिष्टीत लॉर्ड्स मैदानावर झालेल्या इंग्लंड-न्यूझीलंड मधील फायनल लढतीत अटीतटीचा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये गेला. पण सुपर ओव्हरमध्ये अखेर बाजी मारली ती इंग्लंडने. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडपुढे विजयासाठी 16 धावांचे आव्हान ठेवले होते. पण न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये 15 धावा करता आल्या आणि इंग्लंडने विश्वचषक जिंकला. आजचा सामन्याव्यतिरिक्त सर्वांचे लक्ष्य लागले आहे ते स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरणार, याकडे. या शर्यतीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आघाडीवर होता. दुसरीकडे, त्याच्यासमोर कडवे आव्हान देखील होते. ऑस्ट्रेलिया चा मिशेल स्टार्क (Mitchell Starc), न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) , इंग्लंडचा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) सह अनेक संघाचे खेळाडू होते. (ENG vs NZ ICC CWC 2019 Final: विश्वचषक फायनलची सुपर ओव्हरही टाय तरी इंग्लंड कसा बनला जगज्जेता, पहा हे नियम)

इंग्लंड-न्यूझीलंड मधील विश्वचषक फायनल सामन्यानंतर किवी कर्णधार विल्यमसन याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मन मिळाला आहे. न्यूझीलंडच्या कर्णधाराने यंदाच्या विश्वचषकमध्ये प्रभावी खेळी केली आणि संघाला स्पर्धेच्या फायनलमध्ये नेण्यास महत्वाची भूमिका निभावली. यंदाच्या स्पर्धेत 578 धावा करत केन यांच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. विल्यम्सनचे संघाच्या एकूण धावांमध्ये तब्बल 30 टक्के योगदान दिले आहे. पण अंतिम सामन्यात त्याला फक्त 30 धावा करता आल्या.

दरम्यन, इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातली. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत इंग्लंडने विश्वचषक जिंकला. अटीतटीच्या सामन्यात अंतिम सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला. पण विश्वविजेता कोण होणार, हे कुणीही सांगू शकत नव्हते.