Faf du Plessis (Photo Credit - X)

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा दहावा सामना रविवारी 30 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यात विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला आहे. दिल्लीचा सलग दुसरा विजय आहे. त्याआधी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने 16 व्या षटकात 3 गडी गमावून 166 धावा केल्या.

मिचेल स्टार्कने घेतल्या सर्वाधिक 5 विकेट्स 

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने 18.4 षटकात 10 गडी गमावून 163 धावा केल्या. हैदराबादकडून अनिकेत वर्माने 74 धावांची शानदार खेळी केली. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेनने 32 तर ट्रॅव्हिस हेडने 22 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने व्यतिरिक्त कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या. तर मोहित शर्माला 1 विकेट मिळाली.

फाफ डु प्लेसिसची 50 धावांची शानदार खेळी

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि 81 धावांची भागीदारी केली. दिल्ली कॅपिटल्स संघाने 16 षटकांत फक्त तीन विकेट गमावून लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्ससाठी, सलामीवीर फाफ डु प्लेसिसने 50 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, फाफ डु प्लेसिसने 27 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. फाफ डु प्लेसिस व्यतिरिक्त, जेक फ्रेझर-मॅकगर्कने 38 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून झीशान अन्सारीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. झीशान अन्सारी वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.