KKR vs DC Head To Head: आज कोलकाता अन् दिल्लीचा होणार सामना; जाणून घ्या आकडेवारीत कोण आहे वरचढ

आज आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत कोलकाताचा संघ (Kolkata Knight Riders) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे.  मागील पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) आत्मविश्वास हा उंचावला आहे. तर दुसरीकडे घरच्या मैदानावर ही लढत असली तरी मागील पाचपैकी तीन लढतींमध्ये कोलकत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सध्याचा फॉर्म बघता दिल्लीचे पारडे जड दिसत आहे. (हेही वाचा - Chennai Beat Hyderabad: सीएसकेच्या घातक गोलंदांजीसमोर हैदराबादचे फलंदांज गारद, चेन्नई 78 धावांनी विजयी)

दिल्लीच्या संघात जेक फ्रेसर मॅकगर्क याची निवड करण्यात आली. याचा फायदा दिल्ली संघाला झाला आहे. मॅकगर्क याने पाच सामन्यांमधून तीन अर्धशतकांसह 247 धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने 237.50 च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत. या युवा फलंदाजाने मुंबईविरुद्धच्या लढतीत 27 चेंडूंमध्ये 84 धावांची शानदार खेळी केली होती.

कोलताना नाइट रायडर्सची संभाव्य Playing XI:

फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, वेंकटेश अय्यर, श्रेयस लायर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI:

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, रसिक दार सलाम