Photo Credit- X

Lucknow Super Giants Cricket Team vs Punjab Kings Cricket Team, IPL 2025 13th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या या हंगामात आज 13 वा सामना होत आहे. आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स क्रिकेट टीम (LSG) विरुद्ध पंजाब किंग्ज क्रिकेट टीम (PBKS) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे.

या हंगामात, पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि त्या विजयासह त्यांचे दोन गुण आहेत. पंजाब किंग्ज 5.50 पेक्षा जास्त नेट रनरेटसह पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या काळात लखनऊ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला आहे आणि एक पराभव पत्करला आहे. दोन गुणांसह, लखनौ सुपर जायंट्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सचा नेट रन रेट प्लस 0.963 आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात अनेक सामने खेळले गेले आहेत. या काळात, लखनऊ सुपर जायंट्सने वरचढ कामगिरी केली आहे. जास्तकरून त्यांनीच सामने जिंकले आङेत. तर, पंजाब किंग्जने फार कमी सामने जिंकले आहेत.

एकाना क्रिकेट स्टेडियमवरील रेकॉर्ड:

लखनऊ सुपर जायंट्स (LSG):

सामने: 14

विजय: 7

पराभव: 6

निकाल लागला नाही: 2

विजय टक्केवारी: 54%

पंजाब किंग्ज (PBKS):

सामने: 2

विजय: 1

पराभव: 1

विजय टक्केवारी: 50%