
मानवी संपर्कात राहून पोपट बोलत असल्याचे आवजर आपण ऐकले आहे. पोपट, डॉल्फीन अशा काही पक्षी, जलचरांना बोलतं करण्याचं कसब मानवाने विकसीत केल्याला आता शेकडो वर्षे लोटली. पण, कावळा? कावळा (Crow) बोलू शकतो? आणि तो सुद्धा माणसासारखा? हो, याचे उत्तर होय असे आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील गारगावं (Gargaon) येथील एका कुटुंबासोबत राहणारा एक कावळा चक्क माणसासारखा बोलत (Talking Crow Virl Video) असल्याचे पुढे आले आहे. होय, या बोलक्या कावळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Virl Video) होताच, या कावळ्याला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
काय बोलतो कावळा?
पालघर जिल्ह्यात असलेल्या शहापूर तालुक्यातील गारगावं सध्या भलतंच चर्चेत आहे. हे गाव चर्चेत येण्याचे प्रमुख कारण ठरला आहे एक कावळा. हा कावळा म्हणे चक्क माणसासारखं बोलतो. तो आपल्या मालकाला हाकही मारतो आणि घरातील लोकांची नावेही घेतो म्हणे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आणि विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कावळा चक्क 'आई', 'बाबा', 'काका', 'ताई', 'दादा', 'दादी', 'हट' अशी हाक मारतो. (हेही वाचा, कावळ्याने आपल्या चोचीच्या साहाय्याने उचलला कचरा; पक्षाच्या या कामाने जिंकली नेटीझन्सची मनं (Watch Viral Video))
कावळा शिकला माणसाची भाषा
शहापूर तालुक्यातील गारगाव येथील मांगल्य मुकाणे यांच्या घरात हा कावळा राहतो. पाठिमागचे अनेक दिवसांपासून राहात असलेला हा कावळा चांगलाच माणसाळला आहे. सांगितले जाते की, मुकाणे यांच्या इयत्ता बारावीत शिकणाऱ्या कन्येला एके दिवशी कावळ्याचे एक पिल्लू आजारी आवस्थेत आढळले. तिने ते घरी आणले आणि त्याचा सांभाळ केला. त्यानंतर हा कावळा इतका माणसाळला की, तो या कुटुंबासोबतच राहायला लागला. माणसासोबत राहून राहून तो चक्क माणसाची भाषा शिकला. इतकेच नव्हे तर मानवी व्यवहारात वापरले जाणारे आई, बाबा, काका, ताई, दादा, दादी, हट असे शब्दही तो बोलू लागला. (हेही वाचा, Bird Flu Outbreak in Latur: लातूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! H5N1 मुळे 51 कावळे मृत; बाधित क्षेत्राभोवती 10 किमीचा अलर्ट झोन जाहीर)
हाच तो बोलका कावळा
View this post on Instagram
हा कावळा घरातील सदस्यांच्या अंगाखांद्यावर खेळतो. घरातील कोंबड्या, कुत्री यांनी देखील या कावळ्याल आपल्यातलाच एक सदस्य म्हणून सामावून घेतले आहे. @sanjay.landge.71 नावाच्या अकाउंटवरून बोलक्या कावळ्याचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याती एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने म्हटले आहे की, ''मला वाटतय काकाचा नंबर आलाय, त्याला पावणा नियला आलाय वाटत काका'. दुसरा म्हणतो, 'काकाला घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही हा'. तिसऱ्या व्यक्तीने तर भलतीच प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओत दिसणारा निळा ड्रम पाहून त्याने म्हटले आहे 'काका तुमच्या घरात ड्रम आहे बर का जरा जपून.